मुंबई- उद्यापासून तीन दिवस देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत. सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्याने आजच म्हणजे शुक्रवारी (दि.29) बँकांची कामे उरकावी लागणार आहेत.
उद्या चौथा शनिवार असल्यामुळे बँकांना सुट्टी असते तर रविवारी साप्ताहिक सुट्टी आणि सोमवारी महात्मा गांधी जयंती असल्याने सर्वच बँकांना सुट्टी राहणार आहे. त्यामुळे या तीन दिवसांत लोकांना पैसे काढण्यासाठी पुर्णपणे एटीएमवर अवलंबून राहावे लागणार आहे. सलग सुट्ट्यांमुळे एटीएममधील पैसे संपून तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सणासुदीच्या काळात एटीएममधून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढली जाते. त्यामुळे एटीएम कोरडी पडू नयेत यासाठी बॅंका पुरेशा प्रमाणात रोख रक्कम उपलब्ध करून देणार असल्याचे समजते. तसेच, लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी बँकानी एटीएममधून पुरेशी रक्कम भरण्याचे पाऊल बॅंकानी उचलले असल्याचे दिसते.
या वर्षात अनेक वेळा सलग बँका बंद राहतील अशा सुट्या येत आहेत. यामुळे बँकेशी संबंधित कामे होण्यास विलंब होतो. मात्र ऑनलाइन व्यवहार केल्याने ही अडचण निर्माण होत नाही. त्यामुळे बहुसंख्य व्यवहार ऑनलाइन अथवा डिजिटल माध्यमातून करण्याचे आवाहन बँकांतर्फे करण्यात येत आहे.
आजच उरकून घ्या बँकेचे व्यवहार, उद्यापासून तीन दिवस बँका बंद
उद्यापासून तीन दिवस देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत. सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्याने आजच म्हणजे शुक्रवारी (दि.29) बँकांची कामे उरकावी लागणार आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 07:37 AM2017-09-29T07:37:47+5:302017-09-29T07:41:37+5:30
उद्यापासून तीन दिवस देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत. सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्याने आजच म्हणजे शुक्रवारी (दि.29) बँकांची कामे उरकावी लागणार आहेत.
Highlightsउद्यापासून सलग तीन दिवस बँका बंद राहणारपैसे काढण्यासाठी एटीएमवर अवलंबून राहावे लागणार ऑनलाइन व्यवहार करण्याचे आवाहन