ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - 1977 साली फक्त एक टेक्सटाईल कंपनीच्या रुपाने सुरु करण्यात आलेल्या रिलायन्स कंपनीने गेल्या 40 वर्षात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगती केली असल्याची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सर्वसाधारण सभेत बोलताना मुकेश अंबानी यांनी रिलायन्सचा आतापर्यंत प्रवास सांगितला. कंपनीच्या प्रगतीबद्दल बोलताना गेल्या 40 वर्षात रिलायन्स एक मोठी कंपनी झालं असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी आपले वडिल धीरुभाई अंबानी यांची आठवण काढली आणि बैठकीत उपस्थित असलेल्या आपल्या आईचे आभार मानले. यावेळी मुकेश अंबानींसह त्यांची आई भावूक झालेल्या दिसल्या.
संबंधित बातम्या
मुकेश अंबानी यांनी सांगितलं की, "1977 साली रिलायन्सची 70 कोटींचा उलाढाल होती, जी वाढून 3.30 लाख कोटींपर्यंत पोहोचली आहे. ज्या लोकांनी 1977 साली रिलायन्सच्या शेअर्समधअये 1000 रुपये गुंतवले होते, त्यांच्याजवळ आज 16.5 लाखांहून जास्त रक्कम आहे. गुतंवणूकदारांच्या भांडवलात जवळपास 1600 टक्क्यांची ही वाढ आहे". 1977 साली रिलायन्समध्ये 10 हजार गुंतवणारे आज करोडपती आहेत.
#RILat40
— Reliance Jio (@reliancejio) July 21, 2017
Our turnover has grown from 70 crores in 1977 to over 330,000 crores today – an increase of nearly 4,700 times: Mukesh Ambani
"म्हणजेत गेल्या 40 वर्षात दर अडीच वर्षात शेअर होल्डर्सची रक्कम दुप्पट होत गेली. इतकंच नाही यावेळी कंपनीच्या नफ्यातही 10 हजार टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली", अशी माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. मुकेश अंबानी यांनी सांगितलं की, कंपनीला तीन हजार कोटींचा नफा झाला होता, जो आता वाढून 30 हजार कोटींपर्यंत पोहोचला आहे.
#RILat40
— Reliance Jio (@reliancejio) July 21, 2017
One thousand rupees invested in Reliance shares in 1977 is today worth Rs 16,54,503 – over 1,600 times more valuable: Mukesh Ambani
मुकेश अंबानी बोलले की, "गेल्या 40 वर्षात रिलायन्स एका छोट्या स्टार्टअपपासून ते जगातील एक प्रसिद्ध कंपनी झाली आहे. यावेळी आमची 33 कोटींची एकूण संपत्ती 20 हजार टक्क्यांनी वाढली असून सात हजार कोटी झाली आहे.
#RILat40
— Reliance Jio (@reliancejio) July 21, 2017
I want to dedicate these 40 years of achievements and records to our founder Chairman Shri Dhirubhai Ambani: Mukesh Ambani
"मार्केट कॅप जो 10 कोटी रुपये होता, तो 50 हजार टक्क्यांनी वाढून पाच लाख कोटी रुपये इतका झाला आहे", अशी माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. रोजगार क्षेत्रात रिलायन्सच्या योगदानाबद्दल बोलताना मुकेश अंबानी यांनी सांगितलं की, "1977 मध्ये रिलायन्समध्ये एकूण साडे तीन हजार कर्मचारी काम करत होते. तेव्हा कंपनी फक्त टेक्सटाईल सेक्टरमध्ये काम करत होती. मात्र आज वेगवेगळ्या क्षेत्रात विस्तारलेल्या रिलायन्सचे एकूण 2.5 लाख कर्मचारी आहेत".
Reliance AGM 2017 https://t.co/QhY07IPN8e
— Reliance Jio (@reliancejio) July 21, 2017