Join us

Fuel Price Hike: आजच्या भावामध्येच महिनाभरानंतरचे इंधन खरेदी करता येणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 5:45 AM

 या निर्णयाचा फायदा सर्वसामान्यांना होणार नाही. वायदे बाजारात सट्टा लावून कमाई करणाऱ्यांनाच फायदा होईल.

या निर्णयाचा फायदा सर्वसामान्यांना होणार नाही. वायदे बाजारात सट्टा लावून कमाई करणाऱ्यांनाच फायदा होईल. पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्यास करकपात, हा उपाय असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.नवी दिल्ली : रोज वाढणाºया पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने सर्वसामान्य हैराण असताना, यावर उपाय म्हणून सरकारने इंधनाचे वायदे बाजारात व्यवहार सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. म्हणजे आपल्याला महिनाभरानंतर लागणारे इंधन आजच्या भावात खरेदी करून ठेवता येणार आहे. त्यामुळे दरवाढ झाल्यास त्याचा फटका बसणार नाही.वाढत्या दरांना नियंत्रणात आणण्यासाठी हे व्यवहार इंडियन कमोडिटी एक्स्चेंजमध्ये करण्यास पेट्रोलियम मंत्रालयाने हिरवा कंदील दिला आहे. सध्या सोने, चांदी, तसेच अन्य काही धातू व खनिजांचे आॅनलाइन व्यवहार वायदे बाजारात होतात. या व्यवहारात संबंधित धातू किंवा खनिजे आजच्या किमतीवर भविष्यात खरेदी करता येतात. यात खनिजांची प्रत्यक्ष खरेदी-विक्री न होता, हा संपूर्ण व्यवहार आभासी असतो, पण या बाजारातील दरच सहसा किरकोळ बाजारात व्यवहारांसाठी वापरले जातात. यामुळेच आता पेट्रोल-डिझेलचा त्यात समावेश करण्याबाबत विचार सुरू आहे. ‘सेबी’ आणि इंडियन कमोडिटी एक्स्चेंज लिमिटेड यांनीही त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.असा असतो वायदे बाजारवायदे बाजारातील सौद्यांना ‘फ्युचर अँड आॅप्शन’ संबोधले जाते. यामध्ये गुंतवणूकदार धातू किंवा खनिज आजच्या किमतीवर बुक करतो, पण त्याची प्रत्यक्ष खरेदी काँट्रॅक्टची मुदत संपल्यानंतर केली जाते. यामुळे भविष्यात दर वाढले, तरी त्याला जुन्या दरानेच खरेदी करता येते. यामध्ये आता पेट्रोल-डिझेलचा समावेश केल्यास भविष्यात या इंधनाचे दर कितीही वाढले, तरी गुंतवणूकदार त्याची आजच्याच दराने खरेदी करू शकतील. वायदे बाजारातील दरांचा किरकोळ बाजारावर कायम प्रभाव असतो. त्यामुळेच खनिज तेल किंवा पेट्रोल-डिझेल भविष्यात कितीही महागले, तरी ते प्रत्यक्ष बाजारात स्वस्तात मिळेल, अशी मंत्रालयाला आशा आहे.

टॅग्स :पेट्रोलडिझेल