नवी दिल्ली - अमेरिकी डॉलर इंडेक्समध्ये घसरण आणि दहा वर्षांच्या अमेरिकन बाँडच्या उत्पन्नात घट झाल्यामुळे विदेशी बाजारपेठेतील सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. याचा परिणाम आज देशांतर्गत बाजारावरही झाला आहे.
दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत वाढून 418 रुपये झाली. तसेच, चांदीचे दर प्रति किलो 2,246 रुपयांनी वाढले आहेत. तज्ज्ञांच्या मते, विकसित अर्थव्यवस्थांच्या आर्थिक आकडेवारीत घसरण असल्यामुळे सोन्या-चांदीच्या किंमती मजबूत झाल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कमकुवत झालेल्या डॉलरमुळे सोन्याचे दर दोन आठवड्यांत उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. वृत्तसंस्थेच्या रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, विदेशी बाजारात सोने 1,968.98 (Gold Spot Price) डॉलर प्रति औंस वर पोहोचले आहे.
सोन्याचे नवीन दर (Gold Price on 01 September 2020) : एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 418 रुपयांची वाढ झाली. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,545 रुपयांवरून 52,963 रुपयांवर गेली आहे.
चांदीचे नवीन दर (Silver Price on 01 September 2020) : सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीतही वाढ दिसून आली आहे. आज दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 2246 रुपयांनी वाढला असून त्यानंतर तो 72,793 रुपयांवर पोहोचला आहे.
आणखी बातम्या...
- भाजपात प्रवेश करणार होता हिस्ट्रीशीटर, पोलिसांना पाहताच ठोकली धूम
- चारू सिन्हा यांची सीआरपीएफ श्रीनगर सेक्टरच्या महानिरीक्षकपदी नियुक्ती
- 'या' कंपनीकडून Permanent Work From Homeची सुविधा, ७५ टक्के कर्मचारी करणार घरून काम
- 'लाल डोळे कधी दिसणार?', चिनी सैनिकांच्या घुसखोरीवरून काँग्रेसचा नरेंद्र मोदींवर निशाणा
- 'पिया तू अब तो आजा...' या गाण्यावर वृद्ध महिलांचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल