नवी दिल्ली : स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये (एसबीआय) १ एप्रिल रोजी पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण होणार आहे. एसबीआयमध्ये विलीन होणाऱ्या बँकांत स्टेट बँक आॅफ हैदराबाद, स्टेट बँक आॅफ त्रावणकोर, स्टेट बँक आॅफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक आॅफ म्हैसूर आणि स्टेट बँक आॅफ पतियाळा यांचा समावेश आहे.
विलीनीकरणात या सर्व बँकांची सर्व प्रकारची मालमत्ता एसबीआयकडे हस्तांतरित होईल. या बँकांचे कर्मचारी आणि ग्राहकही एसबीआयकडे हस्तांतरित होतील. विलीनीकरण होत असलेल्या या बँका आपापल्या राज्यात महत्त्वाच्या आहेत.
स्टेट बँक आॅफ हैदराबादचा महाराष्ट्र आणि तेलंगणात मोठा पसारा आहे. स्टेट बँक आॅफ त्रावणकोर केरळातील प्रमुख बँक आहे. स्टेट बँक आॅफ बिकानेर अँड जयपूरचे राजस्थानात तर स्टेट बँक आॅफ पतियाळाचे पंजाबात मोठे जाळे आहे. स्टेट बँक आॅफ त्रावणकोरमध्ये १४ हजार कर्मचारी आहेत. स्टेट बँक आॅफ हैदराबादच्या २ हजार शाखा असून १८ हजार कर्मचारी आहेत.
बँकेची नावेच पुसली जाणार
स्टेट बँक आॅफ त्रावणकोरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या विलीनीकरणामुळे ग्राहकांना चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही.
त्यांच्या खात्यात, पासबुक अथवा चेकबुकात कोणताही बदल होणार नाही. आमच्यासाठी मात्र हा भावनिक मुद्दा आहे. ज्या बँकेच्या सेवेत संपूर्ण आयुष्य घालविले, त्या बँकेचे नावच आता कायमचे पुसले जाणार आहे. या पुढची जी काही वर्षे शिल्लक आहेत, त्या वर्षांत नव्या
बँकेत काम करावे लागेल. कारण आमच्या बँकेचे नावच आता एसबीआय होऊन जाईल.
स्टेट बँकांचे आज विलीनीकरण
स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये (एसबीआय) १ एप्रिल रोजी पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण होणार आहे
By admin | Published: April 1, 2017 12:45 AM2017-04-01T00:45:48+5:302017-04-01T00:45:48+5:30