Lokmat Money > बिझनेस न्यूज > Toll Plaza: टोल वाचवायचा मार्ग आहे का? गुगलचे हे फिचर दाखवणार रस्ता, अशी आहेत वैशिष्ट्ये

Toll Plaza: टोल वाचवायचा मार्ग आहे का? गुगलचे हे फिचर दाखवणार रस्ता, अशी आहेत वैशिष्ट्ये

Toll: प्रवास करताना न टाळता येणारा खर्च म्हणजे टोल. अनेकदा वाहनचालकांचा टोल चुकविण्यावरच भर असतो. परंतु तसे करणे योग्य नसते. टोलनाक्यांवर होणारी वाहतूककोंडी टळावी यासाठी फास्टॅग ही यंत्रणा अलीकडेच आली. आता गुगलने टोल प्राइस नावाचे एक नवे फीचर आणले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 06:55 AM2022-04-07T06:55:32+5:302022-04-07T06:56:20+5:30

Toll: प्रवास करताना न टाळता येणारा खर्च म्हणजे टोल. अनेकदा वाहनचालकांचा टोल चुकविण्यावरच भर असतो. परंतु तसे करणे योग्य नसते. टोलनाक्यांवर होणारी वाहतूककोंडी टळावी यासाठी फास्टॅग ही यंत्रणा अलीकडेच आली. आता गुगलने टोल प्राइस नावाचे एक नवे फीचर आणले आहे.

Toll Plaza: Is there a way to save toll? These are just some of the goal setting shareware that you can use | Toll Plaza: टोल वाचवायचा मार्ग आहे का? गुगलचे हे फिचर दाखवणार रस्ता, अशी आहेत वैशिष्ट्ये

Toll Plaza: टोल वाचवायचा मार्ग आहे का? गुगलचे हे फिचर दाखवणार रस्ता, अशी आहेत वैशिष्ट्ये

 प्रवास करताना न टाळता येणारा खर्च म्हणजे टोल. अनेकदा वाहनचालकांचा टोल चुकविण्यावरच भर असतो. परंतु तसे करणे योग्य नसते. टोलनाक्यांवर होणारी वाहतूककोंडी टळावी यासाठी फास्टॅग ही यंत्रणा अलीकडेच आली. आता गुगलने टोल प्राइस नावाचे एक नवे फीचर आणले आहे. त्याद्वारे तुम्हाला किती टोल द्यावा लागणार आहे किंवा टोल फ्री मार्ग कोणते याची माहिती सहज प्राप्त होणार आहे. 

फीचर नेमके काय आहे?
- टोल प्राइसच्या मदतीने वापरकर्ते त्यांच्या प्रस्तावित मार्गावर किती ठिकाणी टोलनाके आहेत. त्यांना किती टोल द्यावा लागणार आहे, याची माहिती जाणून घेऊ शकणार आहेत.
- ज्या मार्गावरून प्रवास करायचा आहे तेथे टोलमुक्त रस्ते आहेत का, याचीही माहिती या फीचरद्वारा मिळू शकणार आहे.

फीचर कोणत्या देशात उपलब्ध?
- गुगलने दिलेल्या माहितीनुसार टोल प्राइस हे फीचर भारतासह इंडोनेशिया, जपान आणि अमेरिका या देशांत 
एप्रिलअखेरीस उपलब्ध होणार आहे.
- स्मार्टफोनमधील गुगल प्ले स्टोअरमध्ये हे फीचर असेल.टोल प्राइस फीचर स्थानिक टोलिंग अधिकाऱ्याच्या माहितीवर अवलंबून असेल.

    टोलमार्गांचा तपशील?
- टोल प्राइस फीचर वापरकर्त्यांना अनेक घटक लक्षात घेऊन टोलवर किती खर्च होईल, याची माहिती देणार आहे.
- टोल पास, साप्ताहिक तसेच दैनंदिन, दिवसाच्या कोणत्या वेळेत इत्यादींसारखे पेमेंट मेथड्स या फीचरमध्ये उपलब्ध असतील.
- या फीचरमध्ये २००० हून अधिक टोलमार्गांचा तपशील उपलब्ध असेल, असे गुगलचे म्हणणे आहे.
- टोलमुक्त मार्गांची माहिती या फीचरमध्ये असल्याने टोल वाचवून प्रवास करायचा किंवा कसे?, याचा पर्याय वाहनधारकांकडे असेल.

Web Title: Toll Plaza: Is there a way to save toll? These are just some of the goal setting shareware that you can use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.