Join us

Toll Tax Booth : नितीन गडकरींची मोठी घोषणा, 6 महिन्यांत टोल प्लाझा हटणार; गाड्या भन्नाट धावणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 2:40 PM

यासंदर्भात खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे.

हायवेवरून प्रवास करताना आपल्याला अनेक वेळा टोल प्लाझावर थांबावे लागते आणि येथे आपला बराच वेळ वाया जातो. टोलनाक्यांवर लागणारा हा सरासरी वेळ कमी करण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. यातच, आता देशातील महामार्गांवरील टोलनाके हटविण्यासाठी सरकार पुढील सहा महिन्यांत GPS वर आधारित टोल कलेक्शन सिस्टिमसह इतरही काही तंत्रज्ञान आणणार आहे. यासंदर्भात खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे.

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, या मागचा उद्देश रस्त्यावर जाम होण्यापासून रोखणे आहे. चेंबर ऑफ कॉमर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII)च्या एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. ते म्हणाले, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचा (NHAI) सध्याचा टोल महसूल 40,000 कोटी रुपये आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत तो वाढून 1.40 लाख कोटी रुपये होईल. सरकार देशातील महामार्गावरील टोल प्लाझा हटविण्यासाठी जीपीएस बेस्‍ड टोल स‍िस्‍टिम सारखे तंत्रज्ञाना आणण्याचा विचार करत आहे. आम्ही सहा महिन्यात नवे तंत्रज्ञान घेऊन येऊ.

टेस्‍ट‍िंग मोडवर सुरू आहे काम -रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय वाहनांना थांबवल्याशिवाय, टोल कलेक्‍शन करण्यासाठी ऑटोमॅट‍िक नंबर प्लेट ओळख प्रणालीवर काम करत आहे. आर्थिक वर्ष 2018-19 दरम्यान टोल प्लाझावर एक वाहन थांबण्याचा सरासरी वेळ 8 मिनिट एवढा होता. 2020-21 आणि 2021-22 मध्ये फास्टॅग आल्यानंतर, टोल प्लाझावर वाहने थांबण्याचा सरासरी कालावधी कमी होऊन 47 सेकंदांवर आला आहे. 

टॅग्स :नितीन गडकरीटोलनाकामहामार्ग