Lokmat Money > बिझनेस न्यूज > टोल वसुली थेट बँक खात्यातून; राज्यात २५ पैकी २२ नाक्यांवर व्यवस्था

टोल वसुली थेट बँक खात्यातून; राज्यात २५ पैकी २२ नाक्यांवर व्यवस्था

वाहनधारकांना टोल भरण्यासाठी रांगेत तिष्ठत राहण्याची आता गरज नाही. टोलची रक्कम थेट बँक खात्यातूनच वळती करुन घेण्याची इलेक्ट्रॉनिक्स टोल सिस्टीम (इटीसी)राज्यातील राष्ट्रीय

By admin | Published: May 10, 2016 03:31 AM2016-05-10T03:31:34+5:302016-05-10T03:31:34+5:30

वाहनधारकांना टोल भरण्यासाठी रांगेत तिष्ठत राहण्याची आता गरज नाही. टोलची रक्कम थेट बँक खात्यातूनच वळती करुन घेण्याची इलेक्ट्रॉनिक्स टोल सिस्टीम (इटीसी)राज्यातील राष्ट्रीय

Toll tax directly from bank account; Arrangement of 22 out of 25 nos in the state | टोल वसुली थेट बँक खात्यातून; राज्यात २५ पैकी २२ नाक्यांवर व्यवस्था

टोल वसुली थेट बँक खात्यातून; राज्यात २५ पैकी २२ नाक्यांवर व्यवस्था

शिवाजी सुरवसे, सोलापूर
वाहनधारकांना टोल भरण्यासाठी रांगेत तिष्ठत राहण्याची आता गरज नाही. टोलची रक्कम थेट बँक खात्यातूनच वळती करुन घेण्याची इलेक्ट्रॉनिक्स टोल सिस्टीम (इटीसी)राज्यातील राष्ट्रीय महामार्गावरील बहुतांश टोल नाक्यांवर कार्यान्वित झाली आहे. विशेष म्हणजे योजनेचा लाभ घेणाऱ्या वाहनधारकांसाठी स्वतंत्र मार्गिका असल्याने टोल नाक्यावरुनही सुसाट जाता येणार आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील सावळेश्वर आणि वरवडे येथील टोल नाक्यावरील या योजनेचे उद्घाटन सोमवारी झाले.
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही प्रणाली सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते़ त्यानुसार राष्ट्रीय महामार्गाच्या एकूण ३६० पैकी २७५ टोलनाक्यांवर ही सुविधा आहे़ उर्वरित टोलनाक्यांवर देखील ही सुविधा सुरू होणार आहे़ महाराष्ट्रातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर २५ ठिकाणी टोलनाके असून त्यापैकी २२ नाक्यांवर ही सोय करण्यात आली आहे. तीन ठिकाणी लवकरच योजना कार्यान्वीत होईल, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
देशभरातील राष्ट्रीय महामार्गांच्या टोलनाक्यांवर हा पास मिळू शकतो़ त्यांना पास दिल्यानंतर तो काचेवर मध्यभागी लावला जातो़ राष्ट्रीय महामार्गाच्या कोणत्याही टोलनाक्यावरून अशा पासधारकांसाठी स्वतंत्र लेन (ईटीसी) लेन सुरू केली आहे़ पास लावलेले वाहन अशा लेनमधून पास होत असतानाच स्वयंचलित बूम आपोआप उघडला जाईल़ वाहन टोलनाक्यावरून पास होताच वाहनधारकाच्या बँक खात्यातून टोलची रक्कम वसूल होईल़ जेवढ्या वेळेस ये-जा कराल तेवढ्या वेळेत त्या-त्या टोलनाक्याच्या दरानुसार तेवढी रक्कम जमा करून घेतली जाईल़
काय आहे ‘ईटीसी’ लेन
इलेक्ट्रॉनिक्स टोल कलेक्शन सिस्टीम (ईटीसी) ही परदेशी प्रणाली आहे़ आयसीआयसीआय बँक आणि एनएचएआय यांच्या माध्यमातून देशभरातील सर्व टोलनाक्यांवर चालेल असा टॅग (पास) तयार केला आहे़

Web Title: Toll tax directly from bank account; Arrangement of 22 out of 25 nos in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.