नवी दिल्ली : टमाटे आणि मटार यांचे भाव घटण्यास प्रारंभ झाला असून डिसेंबरच्या मध्यापर्यंत हे भाव घटून ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो होण्याची शक्यता आहे.
दिल्लीत आठवडाभरापूर्वी मटारचे भाव १३९ रुपये प्रतिकिलो होते. टमाट्याचे भावही ६० रुपये प्रतिकिलो झाले होते. डिसेंबरमध्ये नवीन पिकाची बाजारात आवक झाल्यानंतर हे भाव घटून ते ३० ते ३५ रुपये किलो होण्याची शक्यता मदर डेअरीतर्फे वर्तविण्यात आली.
सध्या मटारचे भाव ७९ रुपये प्रतिकिलो, तर टमाट्याचे भाव घटून ४८ रुपये ते ५० रुपये प्रतिकिलो झाले आहेत. मदर डेअरीचे किरकोळ व्यवसाय विभागाचे प्रमुख बी. जगदीशराव यांनी सांगितले की, टमाटे आणि मटार या दोन्हींचे भाव आता घटण्यास प्रारंभ झाला आहे. डिसेंबरच्या मध्यापर्यंत नवीन पीक बाजारात आल्यानंतर हे भाव घटून ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो होण्याची शक्यता आहे. पंजाबातून मटारची आवक होण्यास विलंब झाल्याने भाव वाढले आहेत.
टमाटे-मटारचे भाव डिसेंबर मध्यापर्यंत ३५ रुपयांवर येणार
टमाटे आणि मटार यांचे भाव घटण्यास प्रारंभ झाला असून डिसेंबरच्या मध्यापर्यंत हे भाव घटून ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो होण्याची शक्यता आहे.
By admin | Published: November 24, 2015 11:40 PM2015-11-24T23:40:35+5:302015-11-24T23:40:35+5:30