Lokmat Money > बिझनेस न्यूज > टोमॅटोचे दर घसरणीला; सरकारचे प्रयत्न फळास; कांदे, बटाट्याचेही भाव उतरणीला

टोमॅटोचे दर घसरणीला; सरकारचे प्रयत्न फळास; कांदे, बटाट्याचेही भाव उतरणीला

भाववाढ नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना अखेर कामास आल्या असून, कांद्यांसह बटाटे व टोमॅटोचे भाव कमी होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 03:59 PM2024-08-02T15:59:57+5:302024-08-02T16:00:10+5:30

भाववाढ नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना अखेर कामास आल्या असून, कांद्यांसह बटाटे व टोमॅटोचे भाव कमी होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.

Tomato prices fall Government efforts price reduced onions and potatoes have also come down | टोमॅटोचे दर घसरणीला; सरकारचे प्रयत्न फळास; कांदे, बटाट्याचेही भाव उतरणीला

टोमॅटोचे दर घसरणीला; सरकारचे प्रयत्न फळास; कांदे, बटाट्याचेही भाव उतरणीला

मागील काही दिवसांपासून भाज्यांचे भाव गगनाला भिडले होते. ही भाववाढ नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना अखेर कामास आल्या असून, कांद्यांसह बटाटे व टोमॅटोचे भाव कमी होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. सूत्रांनी सांगितले की, आवक वाढल्यामुळे सर्वत्र २९ जुलैपासून टोमॅटोचे भाव कमी होण्यास सुरुवात झाली. ते आता बरेच खाली आले आहेत. सरकार मुंबई आणि दिल्लीत ६० रुपये किलो या दराने टोमॅटो विकत आहे. कांद्याच्या भावात दहा रुपयांची घसरण झाली आहे.

'एनसीसीएफ'ने मुंबई, दिल्लीसह अनेक ठिकाणी स्टॉल लावून ६० रुपये किलो दराने टोमॅटो विकले. स्वस्त टोमॅटो उपलब्ध झाल्यामुळे खुल्या बाजारात भाव खाली आले आहेत. मुंबईत ४ ठिकाणी तसेच राजधानी दिल्लीत १८ ठिकाणी सरकारकडून स्वस्त टोमॅटो विकले जात आहेत. गेल्या वर्षी टोमॅटोचे दर २०० रुपये प्रतिकिलोपेक्षा जास्त होते.

का वाढले भाव?

सूत्रांनी सांगितले की, यंदा मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव वाढले आहेत. ते आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

५० रुपये किलोने विकणार टोमॅटो

टोमॅटोचे वाढते भाव कमी करण्यासाठी सरकार शुक्रवारपासून ५० रुपये प्रति किलो या दराने टोमॅटोची विक्री करणार आहे. ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी सांगितले की, आम्ही २ ऑगस्टपासून दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि मुंबई येथे ५० रुपये किलो या दराने टोमॅटोची विक्री सुरू करणार आहोत.

नवी मुंबईत दर आले निम्यावर

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोचे आवक वाढू लागल्यामुळे दर नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली आहे. एक आठवड्यात होलसेल मार्केटमध्ये टोमॅटोचे दर प्रतीकिलो ४० ते ७० रुपयांवरून १५ ते ४० रुपयांवर आले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये टोमॅटोचे दर ५० २ ते ७० रुपये किलो दराने विकले जात आहे. पुणे, नाशिक, सातारा व इतर जिल्ह्यांमधून टोमॅटोची आवक होत आहे. बाजार समितीमध्ये कांदा २४ ते २९ ३ रुपये व बटाटा २० ते २९ रुपये किलो दराने विकला जात आहे.

किरकोळ मार्केटमधील बाजारभाव

वस्तू  बाजार समिती   किरकोळ मार्केट

टोमॅटो  १५ ते ४० - ५० ते७०

कांदा  २४ ते २९  - ४० ते ६०

बटाटा  २० ते २८ - ४० ते ६० 

Web Title: Tomato prices fall Government efforts price reduced onions and potatoes have also come down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.