गेल्या काही दिवसापासून देशभरात टोमॅटोच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यावरुन सरकारवर टीका सुरु आहेत. टोमॅटोच्या दराने हैराण झालेल्या जनतेसाठी दिलासादायक बातमी आली आहे. वाढलेल्या पुरवठामुळे पुढील १५ दिवसांत टोमॅटोच्या किमती खाली येतील आणि महिन्याभरात सामान्य पातळीवर दर येतील अशी सरकारची अपेक्षा आहे. प्रमुख भाजींच्या किमती अनेक मोठ्या शहरांमध्ये १०० रुपये किलोच्या पुढे गेल्या आहेत.
योगी सरकारची अतिक अहमदवर कारवाई! कोट्यवधींची मालमत्ता सरकारी म्हणून घोषित होणार
ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, हिमाचल प्रदेशातील सोलन आणि सिरमौर जिल्ह्यांमधून चांगला पुरवठा झाल्यामुळे राष्ट्रीय राजधानीत टोमॅटोच्या किरकोळ किमती तत्काळ खाली येतील.
“टोमॅटोचे भाव दरवर्षी वाढतात. प्रत्येक देशातील प्रत्येक शेतमाल किमतीच्या चक्रात ऋतुचक्रातून जातो. जूनमध्ये त्याचे भाव उच्च पातळीवर पोहोचले आहेत.” टोमॅटो हे नाशवंत उत्पादन असून हवामान आणि इतर कारणांमुळे टोमॅटोचा पुरवठाही विस्कळीत झाला आहे.
“तुम्ही टोमॅटो जास्त काळ ठेवू शकत नाही आणि ते लांब अंतरावर नेले जाऊ शकत नाही. हे या खाद्यपदार्थातील एक कमकुवतपणा आहे.” जून-ऑगस्ट आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टोमॅटोचे उत्पादन कमी होते आणि या काळात दर सामान्यतः तीव्र वाढलेले दिसतात, असंही सिंग म्हणाले.