Top-10 Companies Market Cap: मागील आठवड्यात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर लिस्टेड टॉप-10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घट झाली. या कंपन्यांना एकूण 74,000 कोटींचा तोटा सहन करावा लागला. यादरम्यान, तीन कंपन्यांनी जोरदार कमाई केली. यात आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिडेट (Reliance Industries Ltd) चा समावेश आहे.
एचडीएफसी बँकेला सर्वाधिक फटका शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात सात कंपन्यांच्या बाजार भांडवलात 74,603.06 कोटी रुपयांची घट नोंदवली गेली. यामध्ये HDFC बँक अव्वल स्थानावर आहे. बँकेच्या मूल्यात 25,011 कोटी रुपयांची घट झाली असून तिचे मार्केट कॅप 12,22,392.26 कोटी रुपयांवर आले आहे. याशिवाय, ICICI बँकेचे मार्केट कॅप 12,781 कोटी रुपयांनी घसरले असून ते 6,66,512.90 कोटी रुपयांवर आले आहे. या दोन बँकांनी गुंतवणूकदारांची निराशा केली.
या कंपन्यांनाही मोठा फटकाबीएसईवर लिस्टेड इतर कंपन्यांनाही मोठा फटका बसला, यात सुनील मित्तल यांच्या नेतृत्वाखालील भारती एअरटेलचे बाजार भांडवल 11,096.48 कोटी रुपयांनी घसरुन 4,86,812.08 कोटी रुपये झाले. याशिवाय, हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवल 10,396.94 कोटी रुपयांनी घसरुन 5,87,902.98 कोटी रुपयांवर आले, तर ITC चे 7,726.3 कोटी रुपयांनी घसरून 5,59,159.71 कोटी रुपये झाले. याशिवाय, बजाज फायनान्सचा एमकॅप 4,935.21 कोटी रुपयांनी घसरुन 4,27,996.97 कोटी रुपयांवर आला, तर इन्फोसिसचा 2,656.13 कोटी रुपयांनी घसरून 5,69,406.39 कोटी रुपयांवर आला.
रिलायन्स-टीसीएस गुंतवणूकदारांची कमाईएचडीएफसी-आयसीआयसीआय बँक ते आयटीसी सारख्या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना गेल्या आठवड्यात तोटा सहन करावा लागला आहे, तर मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने त्यांच्या गुंतवणूकदारांना तब्बल 25,607.85 कोटी रुपयांची कमाई करुन दिली. टाटा समूहाची कंपनी TCS दुसऱ्या स्थानावर आहे. तिचे मार्केट कॅप रु. 2,579.64 कोटींनी वाढून रु. 12,62,134.89 कोटी झाले. देशातील सर्वात मोठी बँक SBI चे गुंतवणूकदार देखील फायदेशीर राहिले आणि SBI चे मार्केट कॅप 847.84 कोटी रुपयांनी वाढून 5,12,451.22 कोटी रुपयांवर पोहोचले.
(टीप- शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी जानकारांचा सल्ला घ्या.)