गेल्या काही वर्षांत भारत सोडून परदेशात स्थायिक होण्याचा ट्रेंड वाढला आहे. जर तुम्हीही परदेशात जाण्याचा विचार करत असाल, तर तेथील खाण्यापिण्याचे बजेट पाहूनच निर्णय घेणे योग्य ठरेल. कारण, जगात असे काही देश आहेत, जे तुमचे बजेट पूर्णपणे हलवू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशा 10 देशांबद्दल सांगत आहोत, जिथे अन्नधान्याची महागाई (Food Inflation) सर्वाधिक आहे.
अलीकडेच वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने (World of Statistics) ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जगातील सर्वाधिक अन्नधान्य महागाई असलेल्या देशांची यादी जाहीर केली आहे. या यादीत व्हेनेझुएला, लेबनॉन, अर्जेंटिना, झिम्बाब्वे, इराण, इजिप्त, तुर्की, पाकिस्तान, हंगेरी, नायजेरिया या देशांचा समावेश आहे.
जगातील सर्वात महागड्या देशांच्या यादीत व्हेनेझुएला पहिल्या क्रमांकावर आहे. येथील खाण्यापिण्याचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. व्हेनेझुएलामध्ये खाद्यपदार्थ 471 टक्क्यांनी महागले आहेत. मध्यपूर्वेतील देश लेबनॉनमध्येही विक्रमी महागाई आहे. ते यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे खाद्यपदार्थ 350 टक्क्यांपर्यंत महागले आहेत.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार, अर्जेंटिनामध्ये अन्नधान्य महागाई 115 टक्क्यांवर पोहोचली आहे. अर्जेंटिना महागाईच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. झिम्बाब्वे चौथ्या क्रमांकावर आहे, जिथे अन्नधान्य महागाईचा दर 102 टक्क्यांवर पोहोचला आहे. इराणमध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तू 78.5 टक्क्यांनी महाग झाल्या असून हा देश महागाईच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
याशिवाय, इजिप्तमध्ये महागाईचा दर 54.7 टक्क्यांवर पोहोचला आहे. तुर्कीमध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तू 52.5 टक्क्यांनी महाग झाल्या आहेत. पाकिस्तानमध्ये अन्नधान्य महागाईचा दर 48.65 टक्क्यांवर पोहोचला आहे. हंगेरी महागाईच्या यादीत नवव्या क्रमांकावर आहे, याठिकाणी अन्नधान्य महागाई 34 टक्के आहे. तर नायजेरियामध्ये अन्नधान्य महागाई 115 टक्क्यांवर पोहोचली आहे.