Highest Income Tax Countries : वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू २०२३ च्या रिपोर्टनुसार, जगात असे काही देश आहेत. जिथे आयकराचे दर इतके जास्त आहेत की तेथील लोकांना त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा सरकारला द्यावा लागतो. जे देश सर्वाधिक आयकर गोळा करत आहेत, त्यांची प्रगतीशील कर प्रणाली आहे. ज्यामध्ये जास्त कमावणाऱ्या लोकांवर मोठा कर आकारला जातो. जमा होणारा बहुतांश पैसा मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी वापरला जातो.
- अहवालानुसार, फिनलंड जगातील सर्वाधिक आयकर आकारणारा देश आहे. येथे वैयक्तिक आयकराचा कमाल दर ५७.३% आहे. नागरिकांना उत्तम राहणीमान देण्यासाठी येथे सर्वाधिक कर वसूल केला जातो.
- फिनलंड नंतर जपानचा क्रमांक लागतो. जपानमधील सर्वोच्च आयकर दर ५५.९५% आहे. येथे प्रगतीशील कर प्रणाली लागू केली आहे, ज्यामध्ये जास्त उत्पन्न असलेल्या लोकांना जास्त कर भरावा लागतो.
- जगात सर्वाधिक आयकर गोळा करणाऱ्या देशांमध्ये डेन्मार्कचा तिसरा क्रमांक लागतो. डेन्मार्कमध्ये सर्वाधिक आयकर दर ५५.९% आहे. येथे देखील प्रगतीशील कर प्रणाली आहे. येथे उच्च उत्पन्नावर उच्च कर लादला जातो.
- ऑस्ट्रिया देखील आपल्या नागरिकांकडून खूप जास्त आयकर वसूल करतो. येथे वैयक्तिक आयकर दर ५५% पर्यंत आहे. या कराच्या माध्यमातून आरोग्यसेवा, शिक्षण आणि पायाभूत सुविधांसारख्या सार्वजनिक सेवांसाठी निधी उभारला जातो.
- जगात सर्वाधिक आयकर वसूल करणाऱ्या देशांच्या यादीत स्वीडन पाचव्या क्रमांकावर आहे. येथे वैयक्तिक आयकर दर ५३.३% पर्यंत जातो.
- अरुबा हा दक्षिण कॅरिबियन समुद्रात वसलेला एक छोटासा देश आहे. हा बेट देश त्याच्या सौंदर्य आणि सुरक्षित पर्यटन स्थळांसाठी ओळखला जातो. या छोट्या देशात आयकर दर ५२% इतका उच्च आहे.
- चॉकलेटसाठी प्रसिद्ध असलेल्या बेल्जियममध्ये आयकर दर ५०% आहे. करातील सर्वाधिक पैसा व्यापक समाजकल्याणासाठी वापरला जातो. येथे उच्च उत्पन्न असलेल्या गटावर जास्त कर आहे.
- सतत युद्धभूमीवर असलेला इस्त्राइल कर आकारणीतही माग नाही. ते त्यांच्या नागरिकांकडून खूप जास्त आयकर वसूल करतात. इस्रायलचा सर्वोच्च आयकर दर ५०% आहे.
- स्लोव्हेनिया हा एक छोटा युरोपियन देश त्याच्या प्रगतीशील कर प्रणालीसाठी ओळखला जातो. येथे आयकराचा सर्वाधिक दर ५० टक्के आहे. प्राप्तिकरातून मिळणारी रक्कम नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी वापरली जाते.
- नेदरलँड्समध्ये वैयक्तिक आयकर दर ४६.५% आहे. जगातील सर्वाधिक कर वसूल करणाऱ्या देशांच्या यादीत तो दहाव्या स्थानावर आहे. रहिवासी त्यांच्या जगभरातील उत्पन्नावर कर भरतात, तर अनिवासी विशिष्ट स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरतात.