ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - सध्या सर्वत्र डिजीटल होत असल्यामुळे मोबाईल कंपन्यामध्येही रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहे. जागतिक मोबाईल मार्केटमध्ये मोठ्याप्रमाणात स्मार्टफोनची विक्री होत आहे. अनेक कंपन्यांनी ग्राहकांच्या पसंतीला उतरतील असे स्मार्टफोन मार्केटमध्ये आणले आहेत. बाजारात सध्या आयफोनपासून सॅमसंग, ओपो आणि विवो या कंपन्यांनी स्मार्टफोनची आवक वाढली आहे. गेल्या काही दिवसात अॅपल कंपनीने जागतिक बाजरात सॅमसंगला मागे टाकत अव्वल स्थान काबिज केले आहे. IHS ने जगात सर्वात जास्त विकले गेलेल्या फोनची यादी जाहीर केली आहे. जाणून घेऊयात जगात सर्वात जास्त विकले जाणारे 10 स्मार्टफोन कोणते आहेत.
1) सप्टेबंर 2015 मध्ये लाँच झालेला आयफोन - 6s अल्पवधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. हा 2016 मध्ये जगात सर्वाधिक विकला गेलेला फोन आहे. ई-कॉमर्स वेबसाइटवर सध्या हा फोन 38 हजार रुपयाला उपलब्ध आहे.