Join us

Health Insurance : आरोग्य विमा घ्यायचा असल्यास 'या' गोष्टी लक्षात ठेवा; जाणून घ्या, टॉप 15  प्लॅन!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 5:30 PM

Health Insurance : कोरोनानंतर आरोग्य विम्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : लोकांनी आपल्या आरोग्याची खूप काळजी घेतली पाहिजे. तब्येत चांगली राहिली तर आपली अनेक कामेही खूप सोपी होतात. मात्र, अनेक वेळा खूप काळजी घेऊनही अनेक आरोग्यविषयक समस्या लोकांना भेडसावतात. त्यामुळे दवाखान्यात जावे लागते आणि औषधोपचारावरही मोठा खर्च करावा लागतो. मात्र, आता हॉस्पिटलायझेशनचा खर्च टाळण्यासाठी लोक आरोग्य विम्याकडे खूप लक्ष देत आहेत.

गेल्या दोन वर्षात कोरोना या साथीच्या आजाराने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले. याचा परिणाम मानसिक, शारीरिक आरोग्याबरोबर आर्थिक स्थितीवर ही प्रामुख्याने जाणवला. घरातील सदस्यांना कोरोनाची लागण त्यात, उपचाराचा खर्च देखील परवडणारा नव्हता. तसेच विमा नसलेल्यांना तर याचा मोठा फटका बसला. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांच्या भविष्यासाठी आरोग्य विम्याकडे कल वाढवला.  कोरोनानंतर आरोग्य विम्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.

दरम्यान, आरोग्य विमा प्लॅनच्या मदतीने रुग्णालयाशी संबंधित अनेक मोठ्या खर्चावर मात करता येते. बाजारात अनेक कंपन्या हेल्थ प्लॅन ऑफर करत आहेत, पण त्यापैकी कोणते चांगले आहे हे जाणून घेणे लोकांसाठी खूप कठीण काम आहे. आज आम्ही तुम्हाला 65 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी टॉप 15 आरोग्य विमा प्लॅनबद्दल सांगणार आहोत. हे आरोग्य विम्याच्या संदर्भात दोन महत्त्वपूर्ण परिणामांसाठी तयार केले गेले आहेत. हॉस्पिटलायझेशन आणि जलद क्लेम सेटलमेंटमुळे सर्वात कमी खर्च. अशा परिस्थितीत या आरोग्य विमा प्लॅनवर लोकही खूप विश्वास व्यक्त करत आहेत, असे गृहीत धरले जाऊ शकते.

याकडे गोष्टींकडे लक्ष द्या...- एज क्रायटिरिया- प्रीमियम आणि कव्हरेज- वेटिंग पीरियड- कॅशलेस हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे फायदे- हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याआधी आणि नंतरचे कव्हरेज- मॅटपनिटी कव्हरेज- नो-क्लेम-बोनस / नो-क्लेम-डिस्काउंट 'हे' आहेत टॉप 15 विमा प्लॅन1. Niva Bupa- Health ReAssure2. Royal Sundaram- Lifeline (Supreme Plan)3. Niva Bupa- Health Companion4. Magma HDI- One Health (Premium Plan)5. HDFC Ergo- Optima Restore6. Aditya Birla Health- Activ Health Plantinum (Premiere Plan)7. Edelweiss General- Family Health insurance (Gold Plan)8. Care Insurance- Care9. ICICI Lombard- Complete Health Insurance (Health Elite Plan)10. HDFC Ergo- Optima Secure11. Go Digit- Health Insurance (Comfort Pro Plan)12. Manipal Cigna- ProHealth (Plus Plan)13. Chola MS- Flexi Health14. Aditya Birla Health- Active Assure15. Star Health- Comprehensive

टॅग्स :आरोग्यव्यवसाय