सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कार परवडत नाहीत. तर दुसरीकडे प्रदुषणही वाढले आहे, यामुळे आता यावर पर्याय म्हणून सीएनजीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.आता बाजारात सर्वोत्कृष्ट सीएनजी कार असल्याचा दावा करणाऱ्या मोठ्या संख्येने कार आहेत ज्या कमी किमतीत दीर्घ मायलेजचा दावा करतात.आज आपण टॉप 3 कारबद्दल माहिती घेणार आहोत.
मारुती सुझुकी अल्टो सीएनजीला कंपनीने कारच्या बेस मॉडेलसह बाजारात आणली आहे. मारुती अल्टोच्या CNG किट प्रकारांची किंमत ५,०३,००० रुपये आहे. ऑन रोड या कारची किंमत ५,५५,१८७ रुपये आहे.
खुषखबर! iPhone 13 पुन्हा स्वस्त झाला, येथे Amazon-Flipkart पेक्षाही मिळेल मोठी सूट
ही कार पेट्रोलवर २२.०५ किलोमीटर मायलेज देते. सीएनजी किटवर हे मायलेज ३१.५९ किमी/किलोपर्यंत वाढते. हे मायलेज एआरएआयने प्रमाणित केले आहे.
कंपनीने नुकतीच नवीन डिझाइन आणि फीचर्ससह मारुती सेलेरियो बाजारात आणली आहे. कंपनीने या कारच्या VXi प्रकारात CNG किटचा पर्याय दिला आहे. CNG किटसह या मॉडेलची किंमत ६,६९,०० रुपये आहे. ही Celerio कार पेट्रोलवर २५.२४ किवोमीटर आणि CNG वर ३५.६ किलोमीटर मायलेज देते.
मारुती वॅगनआर हॅचबॅक ही एक लोकप्रिय कार आहे, तिच्या किमतीव्यतिरिक्त, मायलेज आणि स्पेससाठी अनेकांची पसंती आहे. कंपनीने दोन प्रकारांमध्ये CNG किटचा पर्याय दिला आहे, ज्यामध्ये पहिला पर्याय LXI आणि दुसरा पर्याय VXi आहे.
मारुती Wagonr CNG LXI प्रकाराची एक्स-शोरूम किंमत ६,४२,५०० आहे जी ऑन-रोड ७२०,१६६ आहे. तर CNG किटसह VXI प्रकारची किंमत ६,८६,००० रुपये आहे, याची ऑनरोड ७,७३,२०७ रुपयांपर्यंत जाते.
मारुती सुझुकी वॅगनआर सीएनजीचे मायलेज पेट्रोलवर २५.१९ किलोमीटर आहे तर सीएनजी किटवर त्याचे मायलेज ३४.०५ किलोमीटर पर्यंत वाढते.