Lokmat Money > बिझनेस न्यूज > ऑनलाईन शॉपिंगमध्ये 'Amazon'चीच हिटविकेट; चुकून १ लाखाचा एसी ६ हजारांना विकला

ऑनलाईन शॉपिंगमध्ये 'Amazon'चीच हिटविकेट; चुकून १ लाखाचा एसी ६ हजारांना विकला

Amazon Online Shopping : चुकून अॅमेझॉननं ६ हजारांत विकला लाखाचा एसी. इतकंच काय तर त्यावर दिला ईएमआयचाही ऑप्शन.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 08:08 PM2021-07-05T20:08:04+5:302021-07-05T20:09:59+5:30

Amazon Online Shopping : चुकून अॅमेझॉननं ६ हजारांत विकला लाखाचा एसी. इतकंच काय तर त्यावर दिला ईएमआयचाही ऑप्शन.

Toshiba 1 8 ton inverter AC listed for Rs 5900 on Amazon bought by some online shopping | ऑनलाईन शॉपिंगमध्ये 'Amazon'चीच हिटविकेट; चुकून १ लाखाचा एसी ६ हजारांना विकला

ऑनलाईन शॉपिंगमध्ये 'Amazon'चीच हिटविकेट; चुकून १ लाखाचा एसी ६ हजारांना विकला

Highlightsचुकून अॅमेझॉननं ६ हजारांत विकला लाखाचा एसी. इतकंच काय तर त्यावर दिला ईएमआयचाही ऑप्शन.

Amazon नं सोमवारी एक मोठी चूक केली. कंपनीनं तब्बल १ लाख रूपयांचा तोशिबाचा एसी केवळ ५,९०० रूपयांना लिस्ट केला. तसंत जोपर्यंत कंपनीला आपली चूक समजली तोवर अनेकांनी हा प्रोडक्ट खरेदी केला होता. तोशिबाचा हा एसी १.८ टनचा होता. तसंच ५ स्टार रेटिंसह हा एक इन्व्हर्टर एसी आहे. कंपनीचीनं याची मूळ किंमत ९६,७०० रूपयांऐवजी जवळपास ९४ टक्क्यांच्या डिस्काऊंटसह केवळ ५,९०० रुपये लिस्ट केली. 

अॅमेझॉन लिस्टिंगमध्ये या एसीची मूळ किंमत ९०,८०० रूपये इतकी डिस्काऊंटसह होती. परंतु कमी किंमतीत लिस्ट केल्यामुळे ग्राहकांना यावर २७८ रूपयांच्या ईएमआयचा ऑप्शनही दाखवण्यात येत होता. यादरम्यान, अनेक ग्राहकांनी ही चूक पाहिली आणि याचा फायदा घेत एसी खरेदीही केला. यापूर्वीही अॅमेझॉननं अशी चूक केली होती. 

२०१९ मध्येही केली होती चूक
२०१९ मध्ये प्राईम डे दरम्यान अॅमेझॉननं ९ लाख रूपयांच्या कॅमेरा गिअरची ६,५०० रूपयांना विक्री केली होती. ग्राहकांना यात काही चूक असल्याची दिसल्यानंतर अनेकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती. हा गिअर सोनी, फुजिफिल्म आणि कॅननसहित हाय एंड कॅमेरा ब्रान्डसह होता. 

१५-१६ जुलै रोजी अॅमेझॉननं जगभरात प्राईम डेज सेल सुरू केला होता. अमेरिकेत या सेलदरम्यान एक बग आला होता. ज्याच्या अंतर्गत कॅनन EF800 लेन्स ९९ टक्क्यांच्या डिस्काऊंटसह लिस्ट करण्यात आली होती. अशातच अनेक ग्राहकांनी त्याची खरेदी करण्यास सुरूवात केली होती.  

Web Title: Toshiba 1 8 ton inverter AC listed for Rs 5900 on Amazon bought by some online shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.