Lokmat Money > बिझनेस न्यूज > अवघ्या 30 हजारांत 'हा' व्यवसाय सुरू केल्यास दरमहा मिळतील 60 हजार रुपये, जाणून घ्या.... 

अवघ्या 30 हजारांत 'हा' व्यवसाय सुरू केल्यास दरमहा मिळतील 60 हजार रुपये, जाणून घ्या.... 

अनेक व्यवसाय आहेत ज्यात तुम्हाला खूप कमी पैसे गुंतवावे लागतात आणि नफाही चांगला मिळतो. अशाच एक लहान मुलांसाठी खेळणी (Toys) तयार करण्याचा व्यवसाय आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 01:36 PM2023-01-16T13:36:28+5:302023-01-16T13:37:14+5:30

अनेक व्यवसाय आहेत ज्यात तुम्हाला खूप कमी पैसे गुंतवावे लागतात आणि नफाही चांगला मिळतो. अशाच एक लहान मुलांसाठी खेळणी (Toys) तयार करण्याचा व्यवसाय आहे. 

toys and recycling best business for good income | अवघ्या 30 हजारांत 'हा' व्यवसाय सुरू केल्यास दरमहा मिळतील 60 हजार रुपये, जाणून घ्या.... 

अवघ्या 30 हजारांत 'हा' व्यवसाय सुरू केल्यास दरमहा मिळतील 60 हजार रुपये, जाणून घ्या.... 

नवी दिल्ली : जर तुम्ही बेरोजगार असाल तर 'ही' बिझनेस आयडिया तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. जर तुम्हाला घरी बसून व्यवसाय सुरू करायचा असेल तर यामध्ये तुम्ही नोकरीपेक्षा जास्त पैसे कमवू शकता. असे अनेक व्यवसाय आहेत ज्यात तुम्हाला खूप कमी पैसे गुंतवावे लागतात आणि नफाही चांगला मिळतो. अशाच एक लहान मुलांसाठी खेळणी (Toys) तयार करण्याचा व्यवसाय आहे. 

तुम्ही 30,000 रुपयांपेक्षा कमी भांडवलात खेळण्यांचा व्यवसाय सुरू करू शकता. यापूर्वी देशातील बहुतांश खेळणी चीनमधूनच आयात केली जात होती, मात्र आता भारत-चीन तणावामुळे सरकार स्वदेशी धोरणावर काम करत आहे. दरम्यान, हा असा व्यवसाय आहे, जो तुम्हाला वर्षभर नफा देऊ शकतो. त्यात जास्त भांडवल गुंतवण्याची गरज नाही. खेळण्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी सरकारकडून खूप मदत केली जात आहे. कारण सध्या देशात चीनमधून खेळण्यांची आयात कमी झाली आहे. 

अशा परिस्थितीत हा व्यवसाय सुरू करून तुम्ही दरमहा 50 ते 60 हजार रुपयांचा नफा कमवू शकता. तुम्हालाही कमी भांडवल गुंतवून मोठा नफा मिळवायचा असेल, तर तुम्ही टाकाऊ वस्तू म्हणजेच वेस्ट मटीरिअलला (Waste Material) रिसायलक करण्याचा व्यवसाय (Recycling Business Ideas) सुरू करू शकता. या व्यवसायात तुम्हाला सुमारे 10-15 हजार रुपये गुंतवावे लागतील. 

या व्यवसायाद्वारे, तुम्ही भरपूर कमाई (Profit in Waste Material Recycling Business) करू शकता , ज्याची मागणी खूप जास्त आहे. तुम्हीही हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर सर्वात आधी तुमच्या आजूबाजूच्या परिसरातून टाकाऊ वस्तू गोळा करा. टाकाऊ वस्तूंसाठी तुम्ही महापालिकेशीही संपर्क साधू शकता. यानंतर त्या टाकाऊपासून कोणते साहित्य बनवता येतील हे ठरवण्याची वेळ येते.

सरकार करतंय मदत
तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि तुमच्याकडे पैसे नाहीत तर काळजी करू नका. सरकार लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करत आहे. कोणतीही व्यक्ती ज्याला त्याचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तो पीएमएमवाय  (Mudra Loan Yojana)  अंतर्गत कर्ज घेऊ शकतो. तुम्हाला सध्याचा व्यवसाय पुढे न्यायचा असेल आणि त्यासाठी पैशांची गरज असेल, तर तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करू शकता.

Web Title: toys and recycling best business for good income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.