Lokmat Money > बिझनेस न्यूज > १४ जुलैपासून HDFC लिमिटेडच्या शेअर्सचं ट्रेडिंग होणार बंद, पाहा नक्की कारण काय?

१४ जुलैपासून HDFC लिमिटेडच्या शेअर्सचं ट्रेडिंग होणार बंद, पाहा नक्की कारण काय?

एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाचीही लवकरच बैठक पार पडणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 03:50 PM2023-06-27T15:50:30+5:302023-06-27T15:51:26+5:30

एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाचीही लवकरच बैठक पार पडणार आहे.

Trading of HDFC Limited shares will be closed from July 14 what is the exact reason hdfc bank hdfc merger on 1 st july know details | १४ जुलैपासून HDFC लिमिटेडच्या शेअर्सचं ट्रेडिंग होणार बंद, पाहा नक्की कारण काय?

१४ जुलैपासून HDFC लिमिटेडच्या शेअर्सचं ट्रेडिंग होणार बंद, पाहा नक्की कारण काय?

एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचं विलिनीकरण १ जुलैपासून प्रभावी होणार आहे. दोन्ही संचालक मंडळाची मीटिंग ३० जून रोजी पार पडणार आहे. हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनॅन्स कॉर्पोरेशनचे चेअरमन दीपक पारेख यांनी १ जुलैपर्यंत विलिनीकरण प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची अपेक्षा असल्याचं म्हटलं. "१ जुलै रोजी हे विलिनीकरण पूर्ण होणार आहे. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाची निरनिराळी बैठक होणार आहे," अशी माहिती पारेख यांनी दिली.

"प्रत्येक ब्रान्चवर आता मॉरगेज सेलिंग होईल. एचडीएफसी बँक ज्या प्रकारे काम करत आहे त्याप्रकारे हाऊसिंग पोर्टफोलिओदेखील मोठा होईल अशी अपेक्षा आहे. विलिनीकरणासाठी आवश्यक सर्व मंजुरी घेण्यात आल्यात," असं पारेख म्हणाले. याशिवाय १३ जुलै रोजी एचडीएफसी लिमिटेडचे शेअर्स डिलिस्ट होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. डिलिस्ट झाल्यामुळे १३ तारखेनंतर यामध्ये ट्रेडिंग करता येणार नाही.

एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेनं ४ एप्रिल २०२२ रोजी विलिनीकरणाची घोषणा केली. या मर्जर प्लॅन अंतर्गत एचडीएफसी लिमिडेट एचडीएफसी बँकेतली ४१ टक्के भागीदारी घेईल. जर परिस्थिती ठीक असेल तर एचडीएफसीचं विलिनीकरण एचडीएफसी बँकेत केलं जाणार असल्याचं पारेख यांनी २०१५ मध्ये सांगितलं होतं. परंतु यामध्ये दीर्घ कालावधी गेला आणि २०२२ मध्ये विलिनीकरण प्रक्रिया सुरू झाली. 

Web Title: Trading of HDFC Limited shares will be closed from July 14 what is the exact reason hdfc bank hdfc merger on 1 st july know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.