वॉशिंग्टन : अमेरिकेतील माहिती आणि तंत्रज्ञानविषयक कंपन्यांना गुणवत्ता असलेले पात्र कर्मचारी मिळत नाहीत. त्यामुळे त्यांची नियुक्ती करण्यास अडचण येत आहे. या पार्श्वभूमीवर एका आघाडीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने भारतीय तंत्रज्ञान कंपन्यात लोकप्रिय असलेल्या एच-१ बी व्हिसाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्याची मागणी केली आहे.
‘व्हेरिटॉस’चे मुख्य कार्यकारी बिल कोलमन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, एच-१ बी व्हिसाच्या धोरणाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला पाहिजे, असे संपूर्ण सिलिकॉन व्हॅलीचे मत आहे. आम्ही आवश्यक तेवढ्या प्रमाणात पात्र लोकांची नियुक्ती करू शकत नाही, कारण ते येथे उपलब्ध नाहीत. प्रत्येकजण कोणाला ना कोणाला नियुक्त करण्यासाठी स्पर्धा करीत असल्याने वेतन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
बिल कोलमन सिलिकॉन व्हॅली लीडरशिप ग्रुपचे माजी अध्यक्ष आहेत. ते गेल्या ४० वर्षांपासून सिलिकॉन व्हॅलीत कार्यरत आहेत. या महिन्यात ते ‘व्हेरिटॉस’चे मुख्य कार्यकारी बनले आहेत. ‘द कालाईल समूहा’द्वारे खरेदी केल्यानंतर व्हेरिटॉस ही स्वतंत्र कंपनी बनली आहे. ते लवकरच भारताच्या दौऱ्यावर येत आहेत.
ते म्हणाले की, फ्लोरिडातील काही शाखा भारतात स्थलांतरित करण्याची योजना आहे. व्हेरिटॉसचे भारतात जवळपास १७०० कर्मचारी आहेत. पुणे हे त्यांचे मुख्य केंद्र आहे. एच-१ बी व्हिसाद्वारे अमेरिकी नियोक्त्यांना देशात विदेशी व्यावसायिक आणि तज्ज्ञांना नियुक्त करण्यात मदत होईल.
अमेरिकेत मिळेनात प्रशिक्षित कर्मचारी
अमेरिकेतील माहिती आणि तंत्रज्ञानविषयक कंपन्यांना गुणवत्ता असलेले पात्र कर्मचारी मिळत नाहीत. त्यामुळे त्यांची नियुक्ती करण्यास अडचण येत आहे.
By admin | Published: February 20, 2016 02:42 AM2016-02-20T02:42:47+5:302016-02-20T02:42:47+5:30