Lokmat Money > बिझनेस न्यूज > रोख व्यवहार करताय...! वेळीच सावध व्हा; आयकर विभागाचा इशारा

रोख व्यवहार करताय...! वेळीच सावध व्हा; आयकर विभागाचा इशारा

नोटाबंदीनंतर काही महिन्यांत पुन्हा रोखीने व्यवहार करण्यामध्ये मोठी वाढ झालेली असली, तरीही अशा प्रकारे व्यवहार केल्यास अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 10:05 AM2018-12-24T10:05:55+5:302018-12-24T10:07:33+5:30

नोटाबंदीनंतर काही महिन्यांत पुन्हा रोखीने व्यवहार करण्यामध्ये मोठी वाढ झालेली असली, तरीही अशा प्रकारे व्यवहार केल्यास अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

transaction in cash...! Be alert; Income Tax Department watch on you | रोख व्यवहार करताय...! वेळीच सावध व्हा; आयकर विभागाचा इशारा

रोख व्यवहार करताय...! वेळीच सावध व्हा; आयकर विभागाचा इशारा

मुंबई : नोटाबंदीनंतर काही महिन्यांत पुन्हा रोखीने व्यवहार करण्यामध्ये मोठी वाढ झालेली असली, तरीही अशा प्रकारे व्यवहार केल्यास अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आयकर विभागाने असे व्यवहार करणाऱ्यांसाठी सक्त ताकीद दिली असून रोखविरहीत व्यवहार करण्याचे आवाहनही केले आहे. यामुळे जर तुम्हीही रोखीने व्यवहार करत असाल तर हे चार नियम  लक्षात ठेवायलाच हवेत. नाहीतर तुम्हाला दंड भरावा लागेलच परंतू याचबरोबर कायदेशीर कारवाईलाही समोरे जावे लागण्याची शक्यता आहे. काय आहेत हे चार नियम...चला पाहूया...

पहिला नियम : दोन लाखांची रोख स्विकारू नका 
आयकर विभागाने जारी केलेल्या इशाऱ्यामध्ये एका दिवसात एका व्यक्तीकडून दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम घेऊ नये. ही रक्कम एका व्यवहारात असो किंवा अधिक. असे केल्यास दंड भरावा लागू शकतो. 


दुसरा नियम : अचल संपत्तीसाठी 20 हजारांपेक्षा जास्त कॅश नको
अचल संपत्तीच्या घेव-देवीच्या व्यवहारांसाठी तुम्हाला 20 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम रोखीने नाही घ्यायला हवी नाही द्यालया हवी. असे केल्यास दंड भरावा लागू शकतो. 


तिसरा नियम : 10 हजारपेक्षा जादाची रक्कम अदा करणे धोक्याचे 
बिझनेस आणि प्रोफेशनल खर्चासाठी 10 हजार रुपयांपेक्षा अधिक कॅश देणे टाळावे. हा नियम अशा व्यक्तींनी लक्षात 
ठेवायला हवा जे व्यवसाय करतात किंवा वकील, सीए, डॉक्टर आणि प्रोफेशनल जे मोठ्या प्रमाणावर व्यवहार करतात.

 


चौथा नियम : 2000 रुपयांपेक्षा जादाचे दान रोखीने नको
कोणत्याही नोंदणीकृत संस्था किंवा राजकीय पक्षाला दान देताना 2000 पेक्षा जादाची रक्कम रोखीने देणे टाळावे. यापेक्षा जादाची रक्कम दान करायची असल्यास चेक, डिजिटल किंवा पॉलिटिकल बाँडचा वापर करावा. अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तसेच काही प्रकरणांत कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते.

Web Title: transaction in cash...! Be alert; Income Tax Department watch on you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.