नवी दिल्ली : मुंबई शेअर बाजाराकडून (बीएसई) १६१ कंपन्यांवर ५ मेपासून व्यवहार मर्यादा लादण्यात येणार आहेत. वार्षिक नोंदणी शुल्क न भरल्याने ही कारवाई बीएसईकडून करण्यात येणार आहे. यापैकी १४0 कंपन्यांवर अन्य नियामकीय संस्थांकडून आधीच मर्यादा घालण्यात आल्या आहेत. उरलेल्या २१ कंपन्यांपैकी ८ कंपन्यांना टी गटात, तर १३ कंपन्यांना एक्सटी गटात टाकण्यात येणार आहे. टी गटात टाकण्यात येणाऱ्या कंपन्यांत व्हीव्हीएस इंडस्ट्रीज, आल्पस् इंडस्ट्रीज, बिलपॉवर, मधुकॉन प्रोजेक्टस्, री अॅग्रो, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी, पॅराबोलिक ड्रग्ज आणि हनुंग टॉयज अँड टेक्साइल्स यांचा समावेश आहे. एक्सटी गटात टाकण्यात येणाऱ्या कंपन्यांत राठी स्टील अँड पॉवर, मॅग्नम, हिमालया इंटरनॅशनल, अलकेमिस्ट कॉर्प, रेमंड लॅब्ज, ट्रायकॉम फ्रूट प्रॉडक्टस्, इन्फ्रोनिक्स सीस्टिमस् आणि इंडोव्हेशन टेक्नॉलॉजीज यांचा समावेश आहे.बीएसईने म्हटले की, वारंवार स्मरण आणि नोटिसा देऊनही या कंपन्यांनी वार्षिक नोंदणी शुल्क भरलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत आहे. कंपन्यांनी कारवाईच्या आधी शुल्क अदा केल्यास त्यांची नावे थकबाकीदारांच्या अंतिम यादीतून काढली जातील.
५ मेपासून १६१ कंपन्यांवर बीएसई लावणार व्यवहार मर्यादा
By admin | Published: May 01, 2017 1:18 AM