पतंजली फूड्स लिमिटेडच्या (PFL) संचालक मंडळाने पतंजली आयुर्वेद लिमिटेडचा (PAL) 'होम अँड पर्सनल केअर' (एचपीसी) व्यवसाय विकत घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे कंपनीचे आघाडीच्या एफएमसीजी कंपनीत रूपांतर होण्यास वेग येईल. पीएएल एचपीसी व्यवसाय सध्या भारताच्या एफएमसीजी स्पेसमध्ये मजबूत ब्रँड इक्विटी आहे.
या 'होम अँड पर्सनल केअर' व्यवसायात सध्या चार प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे: पहिलं म्हणजे डेंटल केअर, दुसरं म्हणजे स्कीन केअर, तिसरं म्हणजे होम केअर आणि चौथं म्हणजे हेअर केअर. एचपीसी व्यवसायाचं अधिग्रहण करण्याच्या या धोरणात्मक उपक्रमामुळे कंपनीचा विद्यमान एफएमसीजी उत्पादन पोर्टफोलिओ अनेक नामांकित ब्रँडसह मजबूत होईल. याव्यतिरिक्त, महसूल आणि एबिटामध्ये वाढ होण्यास देखील मदत होणार आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, पतंजली फूड्स पतंजली आयुर्वेदचा संपूर्ण नॉन-फूड व्यवसाय विकत घेईल.
काय झाला करार?
पीएफएल पीएएलचा संपूर्ण एचपीसी व्यवसाय विकत घेण्याच्या तयारीत आहे. यात व्यवसायाशी संबंधित सर्व मालमत्ता आणि दायित्वं, संबंधित कर्मचारी, वितरण नेटवर्क, करार, परवाने, परवानग्या, संमती आणि या ऑपरेशनसाठी आवश्यक मंजुरी यांचा समावेश आहे. हे अधिग्रहण आधीच्या विविध अटींच्या पूर्ततेच्या अधीन आहे.
बिझनेस ट्रान्सफरसाठी व्यवहार
बिझनेस ट्रान्सफर अॅग्रीमेंट (बीटीए) नुसार या कराराची एकूण किंमत १,१०० कोटी रुपये असून ती हप्त्यांमध्ये दिली जाणार आहे. २२० कोटी रुपयांचा पहिला हप्ता सीसीआय आणि भागधारकांच्या मंजुरीनंतर कामकाजाच्या १० दिवसांच्या आत दिला जाईल. त्यानंतर इतर हप्ते दिले जातील आणि शेवटचा हप्ता ५५ कोटी रुपये भरला जाईल.