Join us

एटीएममधून पैसे काढताना ट्रांझॅक्शन फेल झाल्यास खात्यातून गेलेले पैसे एका दिवसात मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 9:20 AM

आरबीआयने आर्थिक व्यवहाराबद्दचे नवे नियम लागू केले आहेत. या नवीन नियमांमध्ये एटीएम(ATM)मधून पैसे काढताना ट्रांझॅक्शन फेल झाल्यासंबंधी ग्राहकांना वेळेतच पैसे परतफेड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी दिल्ली: आरबीआयने आर्थिक व्यवहारबद्दलचे नवे नियम लागू केले आहेत. या नवीन नियमांमध्ये एटीएम(ATM)मधून पैसे काढताना ट्रांझॅक्शन फेल झाल्यासंबंधी ग्राहकांना वेळेतच पैसे परतफेड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आरबीआयने आर्थिक व्यवहाराबद्दलच्या नवीन नियमात युनिफाइड पेमेंट सिस्टम, प्रीपेड कार्ड्स सिस्टमसोबतच एटीएममधून व्हवहार करताना तांत्रिक अडचणी या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता एटीएम मधून व्यवहार करताना  ट्रांझॅक्शन फेल झाल्यास ग्राहकांना एका दिवसातच खात्यातून कमी झालेली रक्कम मिळणार आहे.

एटीएम मधून व्यवहार करताना अनेकदा काही तांत्रिक अडचणींमुळे ट्रांझॅक्शन फेल झाल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येत होत्या. तसेच ट्रांझॅक्शन  फेल झाल्यास कामाच्या सात दिवसात ग्राहकांना बँकेकडून रक्कम परतफेड केली जात होती. मात्र आता रिझर्व्ह बँकेकडून टर्नअराउंड टाइम (TAT)च्या संदर्भात नवा आदेश देण्यात आला आहे. यामध्ये एटीएम मधून व्यवहार करताना ट्रांझॅक्शन फेल झाल्यास ग्राहकांना पैसांची परफेड वेळेतच करायला हवी त्यासाठी बँकेकडून तात्काळ मार्ग काढण्यात यावा असे आदेश देण्यात आले आहे. 

एटीएम मधून व्यवहार करताना ट्रांझॅक्शन फेल झाल्यास त्वरीत आपल्या बँकेकडे तक्रार दाखल करावी तसेच एटीएम कार्डवर लिहिलेल्या संपर्क क्रमांक किंवा टोल फ्री नंबरवर कॅाल करुन देखील ग्राहक आपली तक्रार दाखल करु शकतात. प्रत्येक बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे ग्राहक एटीएममधून पैसे आले की नाही हे सिद्ध करु शकतो. त्याचप्रमाणे ज्या बँकेचे कार्ड आहे त्या बँककडून ग्राहकाच्या तक्रारीचं निवारण झाले नाही तर ग्राहक आपली तक्रार बँकिंग लोकायुक्ताकडे दाखल करु शकतो. 

टॅग्स :एटीएमभारतीय रिझर्व्ह बँकबँक