मुंबई : एकीकडे सरकारने काळ््या पैशाविरोधात कारवाई तीव्र केलेली असतानाच आणि परदेशातून भारतात येणाऱ्या पैशावर विशेष लक्ष केंद्रित केलेले असतानाच आता भारतातून परदेशात गेलेल्या पैशांचे व्यवहारही तपासण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे. जुलै २०१५ या महिन्यात भारतातून तब्बल तीन कोटी ८० अमेरिकी डॉलर इतकी रक्कम नागरिकांनी परदेशातील नागरिकांच्या खात्यात वळविल्याचे वृत्त असून आजवरचा वैयक्तिक पातळीवरील हा एका महिन्यातील विक्रमी व्यवहार असल्याने त्याच्या तपासणीकरिता भारतीय रिझर्व्ह बँक सज्ज झाल्याचे समजते. जुलै २०१४ च्या तुलनेत ही रक्कम ११ टक्के अधिक आहे.
उपलब्ध माहितीनुसार, जुलै २०१५ या महिन्यात देशातून अमेरिका, मध्यआशिया आणि युरोपातील काही देशांत तीन कोटी ८० लाख अमेरिकी डॉलरची रक्कम काही लोकांनी वैयक्तिक पातळीवर पाठविली आहे. जुलै महिन्यामध्ये भारतातून परदेशात पैसे पाठविण्याचे प्रमाण दरवर्षीच अधिक असते. कारण या महिन्यात अमेरिका, यरोपातील काही देशांतून शैक्षणिक वर्ष सुरू होते आणि या विद्यापीठांतून भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत असतात. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक शुल्क अथवा अन्य खर्चासाठी पैसे पाठविले जात असतात. गेल्या जुलै २०१४ च्या आकडेवारीवर नजर टाकली तर या महिन्यात सुमारे ९० लाख अमेरिकी डॉलर इतके पैसे परदेशात गेले. त्या तुलनेत यंदा तब्बल ११ टक्क्यांची वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)
परदेशात पाठविलेल्या पैशांचे व्यवहार रडारवर
एकीकडे सरकारने काळ््या पैशाविरोधात कारवाई तीव्र केलेली असतानाच आणि परदेशातून भारतात येणाऱ्या पैशावर विशेष लक्ष केंद्रित केलेले असतानाच आता भारतातून परदेशात गेलेल्या
By admin | Published: October 25, 2015 11:07 PM2015-10-25T23:07:44+5:302015-10-25T23:07:44+5:30