Join us  

UPI द्वारे व्यवहार ५७ टक्क्यांनी वाढले, PhonePe आणि GPay चा हिस्सा ८६ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 3:36 PM

UPI: भारतात लोक UPI वरुन व्यवहार करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने बँकिंग सेक्टर राउंडअप – FY24 मध्ये सांगितले की, भारतातील UPI व्यवहार वार्षिक आधारावर ५७ टक्क्यांनी वाढले आहेत. PhonePe आणि GPay चा UPI मार्केटमध्ये ८७ टक्के वाटा आहे.

कोरोना नंतर देशात डिजिटल पद्धतीने व्यवहार करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. युनिफाइड पेमेंट इंटरफेसही डिजिटल पेमेंटसाठी लोकांची पहिली पसंती आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप  बँकिंग सेक्टर राउंडअप – FY24 नुसार, UPI व्यवहारांमध्ये FY24 मध्ये वार्षिक ५७ टक्के वाढ झाली आहे. यामध्ये PhonePe आणि Google Pay यांचा सर्वाधिक वाटा आहे.

अहवालानुसार, UPI च्या एकत्रित मार्केटमध्ये PhonePe आणि Google Pay चा ८६ टक्के वाटा आहे. गेल्या तीन वर्षांत क्रेडिट कार्डचे व्यवहार दुप्पट झाले आहेत. वार्षिक आधारावर डेबिट व्यवहारांमध्ये ४३ टक्के घट झाली आहे. भारतीय बँकिंग व्यवस्थेने पत वाढीची मजबूत गती कायम ठेवली आहे. FY24 मध्ये क्रेडिट वाढ १५ टक्के आणि डेबिट वाढ १३ टक्क्यांनी वाढली आहे.

फायद्याची बातमी! Jio ने लॉन्च केला स्वस्त प्लॅन, मिळणार अनलिमिटेड कॉल्स, 42GB डेटा

आर्थिक वर्ष २०२४ मध्ये पहिल्यांदाच बँकिंग क्षेत्राचा एकूण निव्वळ नफा ३ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. सर्व बँक ग्रुपनी मालमत्ता परतावामध्ये १ टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे. बँकेला ही उच्च पत वाढ, चांगली हेल्थ ग्रोथ, उच्च क्रेडिट ग्रोथ कमी पत वाढ यांचा फायदा झाला आहे. प्रायव्हेट बँकेच्या नफ्यात वर्ष-दर-वर्ष २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या निव्वळ नफ्यात ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

बँकांनी गुणवत्तेकडे लक्ष देण्याची गरज

या अहवालानुसार, बँकांनी त्यांच्या मालमत्तेच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. बँकांच्या एकूण अनुत्पादित मालमत्ता २.८ टक्क्यांच्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. अहवालात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची सकल अनुत्पादित मालमत्ता ३.५ टक्क्यांपर्यंत आणि खासगी बँकांची जीएनपीए १.७ टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे.

अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२४ साठी भारताचा आर्थिक विकास सर्व अंदाजांना मागे टाकून ८.२ टक्के दराने वाढला आहे. दरम्यान, चालू आर्थिक वर्षासाठी म्हणजेच FY25 साठी आर्थिक वाढ वार्षिक आधारावर ६.२ टक्के ते ७ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. 

टॅग्स :गुगल पेव्यवसाय