मुंबई : कर्ज घेऊन आपण घर अथवा कार खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो. इतकेच नाही तर कर्जाच्या मदतीने आपण शिक्षण, लग्न आणि हवी ती गोष्ट आता विकत घेऊ शकतो. मात्र, कर्जाचे योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे अनेक वेळा आपण कर्जाच्या जाळ्यात अडकतो. ही तुमच्या आर्थिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगली गोष्ट नसते.
अनेक वेळा कितीही आर्थिक नियोजन केले तरी एखादी व्यक्ती कर्जाच्या सापळ्यात अडकते. ही वेळ प्रत्येकासाठी अत्यंत आव्हानात्मक असते. यामुळे आपल्या आर्थिक नियोजनाचे खूप नुकसान होते. त्यामुळे या कर्जाच्या सापळ्यात अडकू नये यासाठी काही उपाय...
कर्जांची समीक्षाnकर्ज कमी करण्यासाठी सर्वांत आधी कोणताही उपाय करण्याअगोदर प्रथम सर्व कर्जांची यादी तयार करा. यात कर्ज, त्याचा ईएमआय आणि त्यांचा व्याजदर आणि किती वर्षांसाठी कर्ज आहे, हे दुसऱ्या बाजूला लिहा. यामुळे आपल्याला तातडीचे आणि सर्वांत महागडे कर्ज ओळखण्यात मदत होईल.
सर्वांत महागडे कर्ज आधी फेडासंपूर्ण कर्जांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला कोणते कर्ज सर्वांत महाग हे समजण्यास मदत होते. हे महाग कर्ज सर्वांत आधी फेडा. खूप जास्त व्याज दिल्याने तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, तुम्ही गृहकर्जावर सुमारे ६.६-९ टक्के, वैयक्तिक कर्जावर १० ते १६ टक्के व्याज भरता. क्रेडिट कार्ड कर्ज तर खूप महाग आहेत. अशा परिस्थितीत, तुम्ही सर्वांत स्वस्त कर्जावर टॉप अप घेऊन उच्च व्याजाचे कर्ज बंद करू शकता.
अतिरिक्त उत्पन्नाचा विचार कराजर तुम्हाला बऱ्याच काळापासून चांगली वेतनवाढ मिळाली नसेल, तर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. या व्यतिरिक्त, आपण ऑनलाइन मार्केटिंग किंवा काही प्रकारचे अर्धवेळ व्यवसाय सुरू करून आपले उत्पन्न वाढविण्याचा विचार करू शकता. हे तुम्हाला कर्जाच्या सापळ्यातून लवकर बाहेर पडण्यास मदत करेल.
जास्त कर्ज घेणे टाळाआपल्याला जितकी गरज आहे, तितकेच कर्ज घ्या. आपल्यावर आधीच कर्जाचा बोजा असेल तर तुम्ही दुसरे कर्ज घेणे टाळावे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आपले सर्व ईएमआय आणि क्रेडिट कार्ड बिले आपल्या एकूण उत्पन्नाच्या ४०-५० टक्क्यांपेक्षा जास्त नसावी.
प्रीपेमेंटचा पर्यायजर आपल्याकडे काही मालमत्ता पडूनच असेल तर ती विकून टाका. तसे करण्यास अजिबात घाबरू नका. ही रक्कम कर्ज फेडण्यासाठी वापरली जाऊ शकते. याशिवाय, तुम्ही तुमच्या बजेटची पुनर्रचना करून अनावश्यक खर्च काढून टाकल्यास, तुम्ही ती रक्कम प्रीपेमेंटसाठी वापरू शकता. प्रीपेमेंटमुळे तुम्ही तुमचे कर्जाचे ओझे मोठ्या प्रमाणात कमी करू शकता.