Join us

‘ट्रॅव्हल बबल एप्रिलपर्यंत सुरू राहण्याची शक्यता’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 6:23 AM

पुरी यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांचे भवितव्य कोरोनाविरोधातील लसीच्या उपलब्धतेवरच अवलंबून आहे. आताच ठोस काही सांगणे कठीण आहे.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय विमान प्रवासात ‘ट्रॅव्हल बबल’ पुढील वर्षी मार्च-एप्रिलपर्यंत सुरूच राहू शकते, असे प्रतिपादन नागरी उड्डयनमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केले आहे. 

पुरी यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांचे भवितव्य कोरोनाविरोधातील लसीच्या उपलब्धतेवरच अवलंबून आहे. आताच ठोस काही सांगणे कठीण आहे. अजून कोणत्याही देशाने आपल्या सीमा पूर्णपणे उघडलेल्या नाहीत. लस उपलब्ध झाली तर देशांना आत्मविश्वास वाटेल. 

‘एअर बबल’ ही दोन देशांत प्रवासी वाहतुकीला परवानगी देणारी व्यवस्था आहे. नियमित आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक ३१ ऑक्टोबरपर्यंत निलंबित करण्यात आलेली आहे. वाहतूक निलंबन मार्च-एप्रिलपर्यंत लांबविले जाऊ शकते, असे संकेत पुरी यांनी दिले आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याविमान