Join us

Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 8:41 AM

जगात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण चीनमध्ये आहेत. पण भारतही यात मागे नाही. परंतु आता यासाठी लागणाऱ्या औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जगात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण चीनमध्ये आहेत. पण भारतही यात मागे नाही. २०२१ च्या आकडेवारीनुसार त्यावेळी भारतात मधुमेहाचे ७.४१ कोटी रुग्ण होते. परंतु मधुमेहाच्या रुग्णांसोबत हार्ट पेशंट, यकृताच्या आजारानं त्रस्त असलेल्या रुग्णांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे. या आजारांच्या उपचारासाठी सामान्यपणे वापरली जाणारी ४१ औषधे आणि सहा फॉर्म्युलेशनच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी (National Pharmaceutical Pricing Authority) या एजन्सीनं यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. 

अनेक औषधं होणार स्वस्त 

फार्मास्युटिकल्स विभाग आणि नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीनं (एनपीपीए) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अँटासिड, मल्टीव्हिटॅमिन आणि अँटीबायोटिक्स ही औषधे स्वस्त होणार आहेत. त्याचबरोबर सर्व फार्मा कंपन्यांना विविध औषधांच्या कमी किमतीबाबत डीलर आणि स्टॉकिस्टना तात्काळ माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जीवनावश्यक औषधं जनतेला परवडणारी राहावीत, यासाठी एनपीपीएच्या १४३ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

भारतात मधुमेहाचे रुग्ण जास्त 

जगात सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारताचाही समावेश होतो. दरम्यान, कोट्यवधी रुग्णांना औषधाच्या किंमतीत कपातीचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. गेल्या महिन्यात १ एप्रिलपासून फार्मास्युटिकल्स विभागानं ९२३ शेड्यूल्ड ड्रग फॉर्म्युलेशनसाठी वार्षिक सुधारित किंमती आणि ६५ फॉर्म्युलेशनसाठी सुधारित रिटेल किंमती जाहीर केल्या होत्या.

टॅग्स :औषधंमधुमेहहृदयरोग