Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारात एन्ट्री घेताच जबरदस्त कमाई, पहिल्याच दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट

शेअर बाजारात एन्ट्री घेताच जबरदस्त कमाई, पहिल्याच दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट

या कंपनीच्या शेअरनं पहिल्याच दिवशी शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 04:08 PM2023-10-06T16:08:49+5:302023-10-06T16:09:01+5:30

या कंपनीच्या शेअरनं पहिल्याच दिवशी शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री घेतली आहे.

Tremendous earnings on entry into the stock market Valeant Laboratories shares made the upper circuit on the first day upper circuit investors huge profit | शेअर बाजारात एन्ट्री घेताच जबरदस्त कमाई, पहिल्याच दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट

शेअर बाजारात एन्ट्री घेताच जबरदस्त कमाई, पहिल्याच दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट

व्हॅलिअंट लॅबोरेटरीजच्या शेअर्सने पहिल्याच दिवशी बाजारात खळबळ उडवून दिली आहे. कंपनीचे शेअर्स शुक्रवारी बीएसईवर 15 टक्के प्रीमियमसह 161 रुपयांवर लिस्ट झाले. आयपीओमध्ये मध्ये व्हॅलिअंट लॅबोरेटरीजचे (Valeant Laboratories) शेअर्स 140 रुपयांना वाटप करण्यात आले होते. बाजारात लिस्ट झाल्यानंतर, व्हॅलिअंट लॅबोरेटरीजचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अपर सर्किटसह 169.05 रुपयांवर पोहोचले. म्हणजेच, ज्या गुंतवणूकदारांनी कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवले त्यांना लिस्टिंगच्या दिवशी सुमारे 21 टक्क्यांचा नफा झाला. कंपनीचे शेअर्स एनएसईवर 162.15 रुपयांवर 15.8 टक्के प्रीमियमसह लिस्ट झाले.

व्हॅलिअंट लॅबोरेटरीजचा आयपीओ एकूण 29.76 पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओचा रिटेल कोटा 16.06 पट सबस्क्राइब झाला. त्याच वेळी, व्हॅलिअंट लॅबोरेटरीज आयपीओमध्ये नॉन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सचा कोटा 73.64 पट सबस्क्राइब झाला. तर क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा (QIB) कोटा 20.83 पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीच्या पब्लिक इश्यूची एकूण साईज 152.46 कोटी रुपयांची आहे.

1365 शेअर्ससाठी बोली
या आयपीओचा प्राईज बँड 133-140 रुपये होता. IPO मध्ये कंपनीचे शेअर्स 140 रुपयांना वाटप करण्यात आले. किरकोळ गुंतवणूकदार कंपनीच्या आयपीओमध्ये किमान 1 आणि जास्तीत जास्त 13 लॉटसाठी बोली लावता येणार होती. आयपीओच्या एका लॉटमध्ये 105 शेअर्स होते, तर 13 लॉटमध्ये शेअर्सची संख्या 1365 होती. म्हणजेच गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये किमान 14700 रुपये आणि जास्तीत जास्त 191100 रुपये गुंतवावे लागणार होते.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Web Title: Tremendous earnings on entry into the stock market Valeant Laboratories shares made the upper circuit on the first day upper circuit investors huge profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.