मुंबई : कुकर्जाच्या प्रमाणात भांडवल पुरवठा होत नाही, तोपर्यंत भारतातील बँकिंग क्षेत्राचा कल (आउटलूक) नकारात्मक राहण्याची शक्यता आहे, असे आंतरराष्ट्रीय मानक संस्था फिच रेटिंग्जने म्हटले आहे.
फिचने म्हटले की, आधीच कमजोर उत्पन्न असलेल्या भारतीय बँकिंग क्षेत्राला कुकर्जाच्या समस्येने ग्रासले आहे. जुनाट तरतुदी आणि अनुत्पादक कर्जांची (एनपीएल) धिमी गती, यामुळे बँकांच्या उत्पन्नावर आणखी ताण वाढला आहे. याचा परिणाम म्हणून भारतीय बँकिंग क्षेत्राचा आगामी काळातील कल नकारात्मकच राहील. कुकर्जाचा वाढता डोंगर आणि कमजोर वित्तीय कामगिरी यावर जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत हा कल सुधारणार नाही.
फिचने म्हटले की, सरकारी बँकांच्या भांडवली स्थितीवर अधिक जोखीम आहे. २१ पैकी ११ सरकारी बँकांचा कोअर कॅपिटल रेशो ८ टक्क्यांच्या खाली आहे. बासेल-३ नियमाचे पालन करण्यासाठी
भारतीय बँकिंग व्यवस्थेला २0१९ पर्यंत अतिरिक्त ४0 ते ५५ अब्ज डॉलरची गरज आहे. त्यापैकी मोठी
रक्कम सरकारी बँकांनाच द्यावी लागेल. सरकारी बँकांना ही रक्कम किमान भांडवली गरज भागविण्यासाठी, तसेच अनुत्पादक कर्जासाठी तरतूद करण्यासाठीच वापरावी लागेल. गेल्या तीन तिमाहींपासून सरकारी बँकांचे अनुत्पादक कर्ज (एनपीएल) सीईट१ मध्ये आहे.
फिचने म्हटले की, सरकारी बँकांचे समभाग मूल्यांकन फारच कमजोर आहे. त्यामुळे या
बँका बाजारातून भांडवल उभे करण्यास अक्षम आहेत. शेवटी
त्यांना भांडवल पुरविण्याची जबाबदारी सरकारलाच घ्यावी लागेल.
बँकिंग क्षेत्राचा कल नकारात्मक राहणार, ‘फिच’चा अंदाज
कुकर्जाच्या प्रमाणात भांडवल पुरवठा होत नाही, तोपर्यंत भारतातील बँकिंग क्षेत्राचा कल (आउटलूक) नकारात्मक राहण्याची शक्यता आहे, असे आंतरराष्ट्रीय मानक संस्था फिच रेटिंग्जने म्हटले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 06:31 AM2018-08-14T06:31:28+5:302018-08-14T06:32:12+5:30