Lokmat Money > बिझनेस न्यूज > Trom Industries IPO: पहिल्याच दिवशी रॉकेट बनला Solar कंपनीचा शेअर; गुंतवणूकदार मालामाल, पैसा दुप्पट

Trom Industries IPO: पहिल्याच दिवशी रॉकेट बनला Solar कंपनीचा शेअर; गुंतवणूकदार मालामाल, पैसा दुप्पट

Trom Industries IPO: सोलार पॉवरच्या व्यवसायाशी संबंधित असलेल्या कंपनीनं पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तुफान एन्ट्री घेतली. ट्रॉम इंडस्ट्रीजचे शेअर्स ९० टक्के प्रीमियमसह २१८.५० रुपयांवर लिस्ट झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 01:34 PM2024-08-01T13:34:19+5:302024-08-01T13:36:50+5:30

Trom Industries IPO: सोलार पॉवरच्या व्यवसायाशी संबंधित असलेल्या कंपनीनं पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तुफान एन्ट्री घेतली. ट्रॉम इंडस्ट्रीजचे शेअर्स ९० टक्के प्रीमियमसह २१८.५० रुपयांवर लिस्ट झाले आहेत.

Trom Industries IPO Solar company shares upper circuit first day Investor huge profit double money | Trom Industries IPO: पहिल्याच दिवशी रॉकेट बनला Solar कंपनीचा शेअर; गुंतवणूकदार मालामाल, पैसा दुप्पट

Trom Industries IPO: पहिल्याच दिवशी रॉकेट बनला Solar कंपनीचा शेअर; गुंतवणूकदार मालामाल, पैसा दुप्पट

Trom Industries IPO: सोलार पॉवरच्या व्यवसायाशी संबंधित असलेल्या ट्रॉम इंडस्ट्रीज या कंपनीनं पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तुफान एन्ट्री घेतली आहे. ट्रॉम इंडस्ट्रीजचे शेअर्स ९० टक्के प्रीमियमसह २१८.५० रुपयांवर लिस्ट झाले आहेत. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ११५ रुपये होती. ट्रॉम इंडस्ट्रीजचा आयपीओ २५ जुलै २०२४ रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आणि २९ जुलैपर्यंत खुला राहिला. कंपनीचा एकूण पब्लिक इश्यू साइज ३१.३७ कोटी रुपये होता. कंपनीचा आयपीओ एकूण ४५९ पट सब्सक्राइब झाला होता.

पहिल्याच दिवशी पैसा दुप्पट

९० टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग झाल्यानंतर कंपनीच्या शेअरला अपर सर्किट लागलं. कंपनीचे शेअर्स ५ टक्क्यांच्या अपर सर्किटसह २२९.४० रुपयांवर पोहोचले. ज्या गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये ट्रॉम इंडस्ट्रीजचे शेअर्स मिळाले, त्यांचे पैसे पहिल्याच दिवशी दुप्पट झाले. कंपनीचे शेअर्स ११५ रुपयांच्या इश्यू प्राइसवरून जवळपास १०० टक्क्यांनी वधारले आहेत.

ट्रॉम इंडस्ट्रीजचा आयपीओ एकूण ४५९ पट सब्सक्राइब झाला. आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा ४८३.१४ पट सब्सक्राइब झाला होता. तर, नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सच्या (एनआयआय) श्रेणीत ७५१.९० पट तर, ट्रॉम इंडस्ट्रीजच्या आयपीओमध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा कोटा १९७.०७ पट सब्सक्राइब झाला.

काय करते कंपनी?

या कंपनीची सुरुवात २०११ मध्ये झाली होती. ही एक सोलार इंजिनिअरिंग, प्रोक्योर अँड कंस्ट्रक्शन कंपनी आहे. रेसिडेन्शिअल रुफटॉप सिस्टम, इंडस्ट्रिअल सोलर पॉवर प्लांट, ग्राऊंड माऊंडेट सोलर पॉवर प्लांट्स, ग्राऊंड माऊंटेड सोलर पॉवर प्लांट्स आणणि सोलर स्ट्रीट लाईट्समध्ये कंपनी कार्यरत आहे. आयपीओच्या माध्यमातून जमवलेल्या रकमेचा वापर कंपनी सोलार पॉवर प्लांट उभारण्यासाठीच्या कॅपिटल एक्सपेंडिचर रिक्वायरमेंटचं फंडिंग, वर्किंग कॅपिटलच्या गरजा आणि समान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरणार आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Trom Industries IPO Solar company shares upper circuit first day Investor huge profit double money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.