Lokmat Money > बिझनेस न्यूज > ट्रकच्या विक्रीतील घसरणीलाही ओला, उबेरच जबाबदार का?

ट्रकच्या विक्रीतील घसरणीलाही ओला, उबेरच जबाबदार का?

ट्रकच्या विक्रीतही का घट झाली, याचे उत्तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी द्यावे, असे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 04:12 AM2019-09-16T04:12:52+5:302019-09-16T04:13:00+5:30

ट्रकच्या विक्रीतही का घट झाली, याचे उत्तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी द्यावे, असे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे.

Truck sales decline too wet, is Uber responsible? | ट्रकच्या विक्रीतील घसरणीलाही ओला, उबेरच जबाबदार का?

ट्रकच्या विक्रीतील घसरणीलाही ओला, उबेरच जबाबदार का?

नवी दिल्ली : ओला, उबेर सेवेच्या वाढत्या वापरामुळे वाहननिर्मिती क्षेत्रावर विपरित परिणाम झाला ही वस्तुस्थिती असेल, तर ट्रकच्या विक्रीतही का घट झाली, याचे उत्तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी द्यावे, असे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, ओला, उबेरमुळे प्रवासी वाहनांच्या विक्रीवर परिणाम झाल्याचे सांगितले जाते. असे
असेल, तर दुचाकी, ट्रक यांच्या विक्रीतही घट का झाली हे जनतेला कळले पाहिजे. पावसामुळे देशात मंदी आल्याचे विधान बिहारचे अर्थमंत्री सुशील मोदी यांनी केले आहे. गुरुत्वाकर्षणाचा नियम अल्बर्ट आईनस्टाईनने शोधून काढला, असे एक केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणत आहेत. ही सारी विचित्र वक्तव्ये असून, त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होणार नाही. उलट अशा वक्तव्यांनी केंद्र सरकारची प्रतिमा मलिन होत आहे, असेही यशवंत सिन्हा म्हणाले.
>हजारोंचा रोजगार बुडाल्याचा आरोप
देशातील युवकांकडून ओला, उबेर सेवांचा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे स्वत:चे वाहन घेण्याची त्यांना फारशी इच्छा होत नाही. त्याचा परिणाम वाहननिर्मिती क्षेत्रावर झाल्याचे निर्मला सीतारामन यांनी नुकतेच सांगितले होते. त्या वक्तव्याची विरोधी पक्षांनी खिल्ली उडविली होती.वाहनांचा खप कमी झाल्याने अनेक वाहननिर्मिती कारखान्यांनी काही दिवस काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. देशात आर्थिक मंदीची चाहूल लागली असून, त्यामुळे हजारो कामगारांचे रोजगार बुडाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. आर्थिक मंदी आली आहे की नाही, याबद्दल केंद्र सरकार स्पष्टपणे काही सांगत नाही, असेही विरोधकांनी म्हटले.

Web Title: Truck sales decline too wet, is Uber responsible?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.