नवी दिल्ली : महिला उद्योजक किरण मुजूमदार शॉ यांच्या बायोकॉन कंपनीच्या बायोकॉन बायोलॉजिक्स या उपकंपनीचे केवळ ३ टक्के समभाग अमेरिकेच्या ट्रू नॉर्थ या गुंतवणूक फंडाने १०० दशलक्ष डॉलर्स देऊन विकत घेतले आहे, अशी माहिती बाजार सूत्रांनी दिली.यामुळे या उपकंपनीचे बाजारमूल्य तब्बल ३.५० अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास २५,००० कोटी झाले. बायोकॉन लिमिटेड या मुख्य कंपनीचे बाजार मूल्य ३६,००० कोटी आहे, व त्यात प्रवर्तकांचे ६१ कोटी समभाग आहेत. बायोकॉन बायोलॉजिक्स ही मुख्य कंपनीने केवळ दोन वर्षांपूर्वी म्हणजेच डिसेंबर, २०१७ मध्ये स्थापन केली आहे व तिचे मुख्य काम बायोकॉनसाठी संशोधन करणे आहे. मुख्य कंपनी बायोकॉनचे प्रवर्तक सध्या व्यवसाय विस्तारासाठी भांडवल विकून पैसा उभारत आहेत. याद्वारे २०० ते ३०० दशलक्ष डॉलर्स उभे करण्याचा प्रयत्न आहे.
ट्रु नॉर्थ कंपनीची बायोकॉनमध्ये मोठी गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 4:55 AM