Join us

शेअर बाजारावर ट्रम्प यांची छाया

By admin | Published: November 04, 2016 5:58 AM

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प विजयी होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने, जगभरातील शेअर बाजारांत घबराट पसरली आहे

मुंबई : अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प विजयी होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने, जगभरातील शेअर बाजारांत घबराट पसरली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ९७ अंकांनी घसरून चार महिन्यांतील नीचांकी पातळीच्या उंबरठ्यावर आला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,५00 अंकांच्या खाली आला आहे.सेन्सेक्स सकाळीच नरमाईने उघडला होता. काही काळाने तो थोडासा सुधारला, पण ही सुधारणा फार काळ टिकली नाही. बाजार पुन्हा खाली आला. सत्राच्या अखेरीस सेन्सेक्स ९६.९४ अंकांनी घसरून २७,४३0.२८ अंकांवर बंद झाला. ८ जुलैनंतरचा हा नीचांकी बंद ठरला. गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्स ४१४.२९ अंकांनी घसरला आहे. निफ्टी २९.0५ अंकांनी घसरून ८,४८४.९५ अंकांवर बंद झाला. (प्रतिनिधी)>सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0 पैकी २0 कंपन्यांचे समभाग घसरले. अदाणी पोर्ट्स समभाग सर्वाधिक ३.९२ टक्क्यांनी घसरला. त्या खालोखाल ओएनजीसी, टाटा स्टील, एशियन पेंट्स, एसबीआय, विप्रो, एनटीपीसी, लुपीन, सन फार्मा, एमअँडएम, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स यांचे समभाग घसरले. >हीरो मोटोकॉर्प, आयटीसी, डॉ. रेड्डीज, टीसीएस, एचडीएफसी बँक, बजाज आॅटो, मारुती, आरआयएल, सिप्ला आणि भारती एअरटेल यांचे समभाग वाढले.