Join us

विश्वास बॅँकेची वार्षिक सभा संपन्न

By admin | Published: August 18, 2015 9:37 PM

नाशिक : विश्वास को-ऑप. बॅँकेची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बॅँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली विश्वास लॉन्स येथे पार पडली.

नाशिक : विश्वास को-ऑप. बॅँकेची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बॅँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली विश्वास लॉन्स येथे पार पडली.
यावेळी विश्वास ठाकूर यांनी बॅँकेच्या १९ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. बॅँकेमार्फत राबविल्या जाणार्‍या विविध सुविधांची त्यांनी माहिती दिली. वाढता ग्राहकवर्ग व सर्वसामान्यांच्या प्रगतीचा ध्यास हेच बॅँकेचे सामाजिक दायित्व असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले. बॅँकेचे ज्येष्ठ सभासद तुकाराम मालुंजकर, उदय रकिबे, शंकरलाल कासट यांनी मनोगत व्यक्त केले. बॅँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांची राज्य सहकारी बॅँक्स असोसिएशनच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरी कुलकर्णी यांनी केले. इतिवृत्ताचे वाचन डॉ. वासुदेव भेंडे यांनी केले. यावेळी अजित मोडक, विक्रम उगले, विलास हावरे, डॉ. सुभाष पवार, घनश्याम येवला, डॉ. चंद्रकांत संकलेचा, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सारिका देशपांडे आदि उपस्थित होते.

फोटो- आरला १८ विश्वास बॅँक या नावाने सेव्ह केला आहे.

विश्वास बॅँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना विश्वास ठाकूर. समवेत डॉ. चंद्रकांत संकलेचा, अजित मोडक, घनश्याम येवला, डॉ. वासुदेव भेंडे, डॉ. सुभाष पवार, विक्रम उगले, सारिका देशपांडे.