Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘ट्रुथजीपीटी’ बाेलणार फक्त सत्य! मस्क यांनी दिला एआय चॅटबॉटचा तिसरा पर्याय

‘ट्रुथजीपीटी’ बाेलणार फक्त सत्य! मस्क यांनी दिला एआय चॅटबॉटचा तिसरा पर्याय

TruthGPT: प्रख्यात अब्जाधीश इलॉन मस्क हे लवकरच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्लॅटफॉर्म ‘ट्रुथजीपीटी’ सुरू करणार आहे. ‘ट्रुथजीपीटी’च्या माध्यमातून मस्क हे ओपनएआयचा ‘चॅटजीपीटी’ आणि गुगलचा ‘बार्ड’ यांना टक्कर देतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2023 12:11 PM2023-04-19T12:11:33+5:302023-04-19T12:11:46+5:30

TruthGPT: प्रख्यात अब्जाधीश इलॉन मस्क हे लवकरच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्लॅटफॉर्म ‘ट्रुथजीपीटी’ सुरू करणार आहे. ‘ट्रुथजीपीटी’च्या माध्यमातून मस्क हे ओपनएआयचा ‘चॅटजीपीटी’ आणि गुगलचा ‘बार्ड’ यांना टक्कर देतील.

'TruthGPT' will be the only truth! Musk gave a third option of AI chatbot | ‘ट्रुथजीपीटी’ बाेलणार फक्त सत्य! मस्क यांनी दिला एआय चॅटबॉटचा तिसरा पर्याय

‘ट्रुथजीपीटी’ बाेलणार फक्त सत्य! मस्क यांनी दिला एआय चॅटबॉटचा तिसरा पर्याय

न्यूयॉर्क : प्रख्यात अब्जाधीश इलॉन मस्क हे लवकरच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्लॅटफॉर्म ‘ट्रुथजीपीटी’ सुरू करणार आहे. ‘ट्रुथजीपीटी’च्या माध्यमातून मस्क हे ओपनएआयचा ‘चॅटजीपीटी’ आणि गुगलचा ‘बार्ड’ यांना टक्कर देतील. एका अमेरिकी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मस्क यांनी ‘ट्रुथजीपीटी’ची घोषणा केली. १७ फेब्रुवारीला त्यांनी या प्रकल्पाचे संकेत दिले होते. ‘आम्हाला ‘ट्रुथजीपीटी’ हवा आहे’, असे त्यांनी ट्वीटमध्ये तेव्हा लिहिले होते. (वृत्तसंस्था)

‘ट्रुथजीपीटी’ हा जास्तीत जास्त सत्य शोधणारा एआय असेल. ‘ट्रुथजीपीटी’च्या लाँचिंगनंतर गुगल आणि ओपनएआय याव्यतिरिक्त तिसरा पर्यायही उपलब्ध होईल.’ ‘एआयमध्ये मानवी सभ्यता नष्ट करण्याची क्षमता आहे’. ‘ट्रुथजीपीटी’ मात्र पूर्णत: सुरक्षित असेल. त्यापासून मानवाला कोणताही धोका असणार नाही.
    - इलॉन मस्क,  ट्विटरचे मालक

एआयला खोटे बोलण्याचे प्रशिक्षण ?
n मस्क यांनी २०१८ मध्ये ओपनएआय सोडले होते. याबाबत मस्क म्हणाले की, ओपनएआयच्या टीमच्या काही गोष्टी आवडल्या नव्हत्या, हेही बाहेर पडण्याचे एक कारण आहे. 
n ‘ओपनएआय’ हा चॅटबॉट एआयला खोटे बोलण्याचे प्रशिक्षण देतो. केवळ नफा कमावण्यासाठी ओपनएआय आता ‘क्लोज्ड सोर्स’ प्लॅटफॉर्म बनला आहे.

Web Title: 'TruthGPT' will be the only truth! Musk gave a third option of AI chatbot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.