सुशील मोटवानी,
संस्थापक, एटीक्सेल
गात कोरोनाची महामारी आली अन् उद्योग-व्यवसायाच्या डिजिटलायझेशनला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन मिळाले. त्यानुसार कॅशलेस व्यवहारांपासून झालेली सुरुवात तंत्रज्ञानातील नवनवे बदल स्वीकारण्यापर्यंत आजतागायत अजूनही सुरू आहे. ग्राहकांच्या खरेदीचा अनुभव वृद्धिंगत करण्यासाठी भारतासह जागतिक स्तरावरील अनेक ब्रँड्सनी त्यांच्या स्टोअर्समध्ये व्हर्च्युअल शॉपिंगचीही सुविधा उपलब्ध केली आहे.
व्हर्च्युअल रिॲलिटी (एआर) व ऑग्मेन्टेड रिॲलिटीमुळे (व्हीआर) ग्राहकांना घरबसल्या स्मार्ट शॉपिंगचा अनुभव घेता येतोय. सध्या आपण कपडे, चष्मा, सौंदर्यप्रसाधने खरेदी करण्यापूर्वी ते आपल्याला कसे दिसतात, हे आपण घरबसल्या ट्राय करू शकतो.
एखाद्या वस्तू वा सेवेची माहिती देण्यासाठी अनेक ठिकाणी व्हर्च्युअल असिस्टंट तसेच ‘एआर’/‘व्हीआर’ सुविधेचा वापर वाढला आहे. ग्राहकांना प्रत्यक्ष खरेदीसोबतच, संबंधित वस्तूसह आभासी जगाचा अनुभव देण्यासाठी एआर चष्मे, तसेच व्हीआर हेडसेट्सची सुविधा भारतातील अनेक आउटलेट्समध्ये उपलब्ध झाली आहे. ब्यूटी इंडस्ट्रीतील एका आघाडीच्या कंपनीच्या आउटलेटमध्ये एआर सपोर्टेड मेकअपची, तसेच एका ज्वेलरी ब्रँडने दिल्ली व बंगळुरू विमानतळावर ग्राहकांना दागिन्यांचा आभासी अनुभव घेण्यासाठी एआर किऑस्क उपलब्ध करून दिले आहेत. एका कंपनीने चष्मा ट्राय करण्यााठी थ्रीडी फेस मॉडेलिंगचे फीचर ॲपवर दिले आहे. भविष्यात व्हीआर ग्लासेसच्या मदतीने ग्राहकांना घरबसल्या व्हर्च्युअल शॉपिंग मॉलमध्ये जाऊन खरेदीचा आनंद घेता येईल.
यापूर्वी फर्निचर खरेदी करायचे झाल्यास किंवा आपल्या घरासाठी नेमका सोफा, डायनिंग टेबल वा पडदे कसे हवेत, त्यासाठी प्रत्यक्ष दुकानांत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आता मात्र दुकानात न जाता सोफा, फ्रीज घरात कुठे ठेवल्यास कसा दिसेल, हे आपण घरबसल्या अनुभवू शकतो. आपल्या स्वप्नातील घर कसे दिसेल, याचे चित्र आर्किटेक्चर, तसेच इंटेरिअर डिझायनरकडून रेखाटून घेण्याचे दिवस गेले, आता व्हर्चुअल रिॲलिटीद्वारे तुम्हाला तुमच्या घराची आभासी सफरही घडविली जाते. पर्यटन क्षेत्रातही एका कंपनीने पर्यटकांना आवडीचे रिसॉर्ट निवडण्यासाठी ३६० डिग्री फोटोज उपलब्ध केले आहेत.
१,१२० कोटी डॉलरची उलाढाल
२०२८ पर्यंत ‘एआर’आधारित शॉपिंगची जगभरातील उलाढाल १,१२० कोटी डॉलरपर्यंत वाढण्याचा अंदाज मार्केट्स ॲण्ड मार्केट्स या संस्थेने वर्तविला आहे. तसेच २०२३ ते २०३२ दरम्यान ‘व्हीआर’आधारित व्यावसायिक क्षेत्रात २५ टक्के वाढ होण्याचीही शक्यता आहे.
प्रत्यक्ष दुकानात आणि घरबसल्याही ग्राहकांची आभासी व इंटरॲक्टिव्ह खरेदीची वाढती मागणी लक्षात घेता, वरील अंदाज मोडीतही निघू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.
जागतिक ब्रँड्सही देतायत सुविधा
nएका आघाडीच्या स्पोर्ट्स वेअर्स ब्रॅण्डने ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार व पायाच्या मापानुसार बूट निवडण्यासाठी त्यांच्या ॲपवर एआरची सुविधा दिलीय.
nनोव्हेंबर २०१९ मध्ये त्यांनी अमेरिकेतील त्यांच्या स्टोअर्समध्ये ग्राहकांना प्रत्यक्ष बूट खरेदी करण्यापूर्वी तो आपल्या कसा दिसतो, हे पाहण्यासाठी व्हीआर हेडसेटची सुविधा दिली होती.
nफर्निचरचा ब्रँड असलेल्या एका कंपनीने २०१७ मध्ये एआर आधारित आयकिया प्लेस ॲप लाँच केले. त्याद्वारे ग्राहकांना त्यांचे घर वा ऑफिसचा मेकओव्हर कसा करता येईल, याचा अनुभव घेता येतो.
nजगातील एका प्रसिद्ध कार कंपनीनेही ग्राहकांना त्यांच्या कारसाठी कस्टमाइज वस्तू खरेदी करण्यासाठी व्हीआर गॉगल्स लाँच केलेत.