Join us  

अदानी अंबानींपेक्षा कमी नाहीत हे दिग्गज व्यावसायिक; १७८ कोटींचं प्रायव्हेट जेट ते हेलिकॉप्टरपर्यंतचे आहेत मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 11:14 AM

त्यांना लक्झरी कार्सचीही आवड असून त्यांच्या कार्सच्या ताफ्यात तीन रोल्स रॉयसदेखील आहेत.

देशातील अब्जाधीशांची संख्या सातत्याने वाढत आहे. भारतातील बहुतांश अब्जाधीश उद्योगपतींची जीवनशैली अतिशय लक्झरी आहे. गौतम अदानी, मुकेश अंबानी, रतन टाटा या दिग्गज उद्योजकांना देशातील प्रत्येक व्यक्ती ओळखत असेल. पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका दिग्गज व्यावसायिकाबद्दल सांगत आहोत, ज्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

त्यांच्या लाईफस्टाईलबाबत ते अंबानी, अदानी यांसारख्या दिग्गजांना स्पर्धा देताना दिसतात. त्याचं नाव टीएस कल्याणरामन (T. S. Kalyanaraman) आहे. टीएस कल्याणरामन हे कल्याण ज्वेलर्स आणि कल्याण डेव्हलपर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. 

कोट्यवधींची नेटवर्थसध्या कल्याण ज्वेलर्सचे देशभरात अनेक आऊटलेट्स आहेत. त्यांची आउटलेट्स भारताबाहेरही आहेत. टी.एस. कल्याणरामन यांनी वयाच्या १२व्या वर्षी व्यवसायिक प्रवासाला सुरुवात केली. टी. एस. कल्याणरामन यांना त्यांच्या वडिलांनी व्यवसायाचं संपूर्ण शिक्षण दिलं. सध्या कल्याणरामन हे भारतातील सर्वात मोठ्या रिटेल ज्वेलरी स्टोअरचे मालक आहेत. कल्याण ज्वेलर्सचे पहिले स्टोअर १९९३ मध्ये सुरू झाले. कंपनीचे सध्याचे मूल्यांकन सुमारे ८,४०७ कोटी रुपये आहे.

लक्झरी कार्सची आवडमीडिया रिपोर्ट्सनुसार, टीएस कल्याणरामन यांना लग्झरी वाहनांची आवड आहे. त्यांच्याकडे सध्या तीन रोल्स रॉयस कार्स आहेत. यामध्ये एक रोल्स रॉयस फॅटम सीरिज I  आणि दोन फँटम सीरिज II मॉडेल्सचा समावेश आहे. प्रसिद्ध ब्रिटीश निर्मात्यानं तयार केलेल्या रोल्स रॉयस फॅंटमची किंमत सुमारे १० कोटी रुपये आहे. या तिन्ही कार्स निरनिराळ्या रंगाच्या आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तीन रोल्स रॉयस व्यतिरिक्त कल्याणरामन यांच्याकडे एक खाजगी जेट आणि एक हेलिकॉप्टर देखील आहे. खासगी जेटची किंमत सुमारे १७८ कोटी रुपये आहे. तर हेलिकॉप्टरची किंमत सुमारे ४८ कोटी रुपये आहे.

टॅग्स :व्यवसाय