तूर डाळ ...२ ...
By admin | Published: August 23, 2015 08:40 PM2015-08-23T20:40:15+5:302015-08-23T20:40:15+5:30
>देशभरात धाडसत्र सुरू कराधान्याचे पॅकिंग करून विक्री करणाऱ्यांची नजर आता तांदूळ आणि गव्हाकडे गेली आहे. ग्राहकांनी काय खरेदी करावे आणि काय करू नये, यावर भाववाढीचे गणित अवलंबून असल्याचे देशमुख म्हणाले. पावसामुळे पीक खराब झाल्यानंतर यंदा डाळवाढ होणार असल्याची कल्पना सरकारला पूर्वीपासून होती. त्यानंतरही तूर आयातीवर गंभीर न राहता केवळ वारंवार निविदा काढण्याची भाषा सरकारने केली. याचाच अर्थ असा की, केंद्र सरकारने मोठ्या कंपन्यांना अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करून अतोनात भाववाढीत सहभाग नोंदविला. प्रचंड दरवाढ होत असताना स्थानिक मिलमालक केवळ १०० ते २०० पोत्यांपर्यंत स्टॉक करू शकतो. भाव केव्हा वाढेल वा कमी होतील, याची भीती असल्यामुळे तयार झालेली तूरडाळ मिलमालक ताबडतोब बाजारपेठेत विक्रीस काढतो. त्यामुळे स्थानिक मिलमालकांकडे तूर डाळीचा साठा असू शकत नाही. देशातील पाच ते सहा औद्योगिक घराण्यांच्या कंपन्यांच्या देशभरातील गोदामावर केंद्र सरकारने धाडी टाकल्यास तूर डाळीचे भाव एका रात्रीतच १०० रुपयांवर येतील, असे मत प्रभाकर देशमुख यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केलेकिरकोळमध्ये तूर डाळ @१४२ !नागपुरातील सर्वच धान्य बाजारात तूर डाळ दर्जानुसार प्रती किलो १३५ ते १४२ रूपयांदरम्यान विक्री सुरू आहे. प्रचंड दरवाढीमुळे गरीब, मध्यमवर्गीयांनी खरेदी थांबविली आहे. वाटाणा डाळ, मसूर डाळ, बटरी आणि लाखोळी डाळ खरेदीकडे त्यांचा ओढा दिसून येत आहे. लाखोळी डाळ ३८ ते ४० रुपये आहे. उडद डाळ दर्जानुसार ११० ते १२० रुपये आहे. सध्या चणा डाळ ५५ ते ६५ रुपयांदरम्यान आहे. यंदाच्या मोसमात चण्याला पावसाचा फटका बसल्यामुळे डाळीच्या किमतीत चण्याची विक्री होत आहे. देशात २१० लाख टन विक्रीदेशात २१० लाख टन सर्व प्रकारच्या डाळीची विक्री होते. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्यामुळे दरवर्षी जवळपास ६० टन डाळ आयात करावी लागते. यंदा विदेशातही डाळीचे उत्पादन कमी असल्यामुळे आयातीसाठी जास्त रक्कम मोजावी लागत आहे.