राजरत्न सिरसाट, अकोला
गतवर्षी पाऊस कमी झाल्याने इतर पिकांसह डाळवर्गीय पिकांचे उत्पादन घटले असून, यातील जीवनसत्त्वयुक्त तूर डाळीचे उत्पादन विदर्भासह राज्यात सरासरी ५० टक्क्यांच्यावर घटल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या डाळीचे दर पुन्हा वाढले असून, घाऊक बाजारात १२,५०० रुपये क्विंटलच्यावर, तर किरकोळ बाजारात दीडशे रुपये प्रतिकिलोच्या जवळपास दर आहेत.
दरम्यान, घाऊक आणि किरकोळ दरात प्रचंड तफावत असल्याने सामान्य ग्राहकांची आर्थिक लूट होत आहे.
भारतात तूर या कडधान्याचे सर्वाधिक क्षेत्र हे महाराष्ट्रात आहे. मागील वर्षी ९३.२० लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती. यावर्षी पावसाला विलंब झाल्याने तुरीचे लागवड क्षेत्र घटले असून, ते ८३.२४ लाख हेक्टरपर्यंत घसरले आहे. यावर्षी यात आणखी घसरण झाली आहे. तूर पीक मुख्यत: कोरडवाहू क्षेत्रात घेतले जाते. यावर्षी या पिकाचे उत्पादन २.७४ लाख टन अपेक्षित होते; पण यामध्ये प्रचंड घसरण झाली आहे.
अपेक्षित हेक्टरी उत्पादन ११ क्ंिवटलच्या वर हवे होते; पण गतवर्षी ऐन फुलोरा, शेंगा येण्याच्या अवस्थेत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पावसाने दडी मारली होती. त्याचा फटका या पिकाला बसला आहे.
परिणामी या डाळीचे किरकोळ बाजारातील दर आजमितीस दीडशे रुपये क्ंिवटलपर्यंत पोहोेचले. या दरवाढीचा सामान्यांच्या खिशावर ताण पडला आहे. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट बिघडत आहे.
आपल्याकडे ८५ टक्के कोरडवाहू क्षेत्रावर तूर आंतरपीक घेतले जाते; पण गेल्यावर्षी नेमका फुलोरा आणि शेंगा धरण्याच्या काळात पावसाने दडी मारल्याने तुरीचे सरासरी उत्पादन ५० टक्क्यांनी घटले आहे. तंत्रज्ञान होते पण पाणीच नव्हते. त्यामुळे उत्पादन घटले असून, दरवाढीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
- डॉ. ए. एन. पाटील, विभागप्रमुख, डाळवर्गीय संशोधन केंद्र,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोेला
तूर डाळ अजूनही १५० रुपये किलो
गतवर्षी पाऊस कमी झाल्याने इतर पिकांसह डाळवर्गीय पिकांचे उत्पादन घटले असून, यातील जीवनसत्त्वयुक्त तूर डाळीचे उत्पादन विदर्भासह राज्यात सरासरी ५० टक्क्यांच्यावर घटल्याचा अंदाज आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2016 03:06 AM2016-02-02T03:06:53+5:302016-02-02T03:06:53+5:30