Lokmat Money > बिझनेस न्यूज > तूरडाळ शंभरीकडे! दीड महिन्यात प्रतिक्विंटलमागे दोन हजारांची वाढ

तूरडाळ शंभरीकडे! दीड महिन्यात प्रतिक्विंटलमागे दोन हजारांची वाढ

सामान्यांपासून उच्चभ्रूपर्यंत सर्वांच्या ताटातील महत्त्वाचा पदार्थ म्हणून गणल्या जाणाऱ्या तूर डाळीचे भाव शंभरीकडे वाटचाल करु लागले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 01:36 AM2019-05-16T01:36:23+5:302019-05-16T01:36:56+5:30

सामान्यांपासून उच्चभ्रूपर्यंत सर्वांच्या ताटातील महत्त्वाचा पदार्थ म्हणून गणल्या जाणाऱ्या तूर डाळीचे भाव शंभरीकडे वाटचाल करु लागले आहेत.

 Tur dal, Two thousand rupees increase in anticipation of one and a half month | तूरडाळ शंभरीकडे! दीड महिन्यात प्रतिक्विंटलमागे दोन हजारांची वाढ

तूरडाळ शंभरीकडे! दीड महिन्यात प्रतिक्विंटलमागे दोन हजारांची वाढ

नागपूर : सामान्यांपासून उच्चभ्रूपर्यंत सर्वांच्या ताटातील महत्त्वाचा पदार्थ म्हणून गणल्या जाणाऱ्या तूर डाळीचे भाव शंभरीकडे वाटचाल करु लागले आहेत. दीड महिन्यातच क्विंटलमागे दोन हजार रुपयांची वाढ होऊन घाऊ क बाजारात दर्जानुसार भाव प्रति किलो ८५ ते ८७ रुपयांवर पोहोचले आहेत. तर किरकोळ बाजारात हे दर ९० ते ९५ रुपये असे आहेत. डाळीप्रमाणेच तुरीचे भावही वाढले आहेत.
तीन वर्षांपूर्वी तूर डाळीचे भाव प्रति किलो १८० ते २०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. वाढीव भावामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले होते. भाव सामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न केले होते, शिवाय आयातही सुरू केली होती. दोन वर्षांपूर्वी तुरीचे उत्पादन जास्त झाल्यामुळे दोन महिन्यातच तूर डाळीचे भाव घाऊ क बाजारात दर्जानुसार ५० रुपयांपर्यंत कमी झाले होते. भाव कमी झाल्यानंतरही ग्राहकांकडून फारशी मागणी नव्हती. या सर्व घडामोडीचा फटका व्यापाऱ्यांना बसला होता. अनेक दाल मिल बंद पडल्या. त्यामुळे व्यापाºयांनी तूर डाळीचा साठा केलाच नाही. यावर्षी पुन्हा पीक कमी झाले आहे. वाढत्या मागणीमुळे भाव पुन्हा वाढले आहेत.

Web Title:  Tur dal, Two thousand rupees increase in anticipation of one and a half month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.