नवी दिल्ली : तुर्कीश एअरलाइन्सचे माजी अध्यक्ष इल्कर आयसी यांनी एअर इंडियाचे सीईओ होण्याची ऑफर नाकारली आहे. एका अधिकृत निवेदनाद्वारे त्यांनी ही घोषणा केली आहे. एअर इंडियाने दिलेली ही ऑफर आपण सध्याच्या स्थितीमध्ये स्वीकारू शकत नाही.
तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्डोगन हे पाकिस्तानचे जवळचे मित्र आहेत. त्यांचे सल्लागार राहिलेले आयसी यांची काश्मीरबाबतची काही मते असल्याबद्दल आलेल्या बातम्यांमुळे आयसी यांनी हे पद न स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. मागील वर्षी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये एर्डोगन यांनी काश्मीरचा विषय मांडला होता. आयसी यांनी चंद्रशेखरन यांना बैठकीत ही माहिती दिली.