नवी दिल्ली : मोबाईल फोन वापरणारे आता मोबाईल हँडसेटद्वारे त्यांची इंटरनेट सेवा सुरू (अॅक्टिव्हेट) करायची की खंडित (डिअॅक्टिव्हेट) करायची याचा एसएमएस पाठवू शकतील किंवा फोन करून सांगू शकतील. ही नवी सेवा येत्या एक सप्टेंबरपासून टोल फ्री नंबर १९२५वर उपलब्ध असेल.
दूरसंचार नियामककडे (टेलिफोन रेग्युलेटरी अॅथॉरिटी आॅफ इंडिया) मोठ्या संख्येने ग्राहकांच्या तक्रारी आल्या होत्या. मोबाईल फोन सेवा देणाऱ्या कंपन्या इंटरनेट सेवा डिअॅक्टिव्हेट करण्याची प्रक्रिया त्यांना महसूल वाढवून मिळण्यासाठी अतिशय गुंतागुंतीची ठेवतात, अशी ग्राहकांची त्यात प्रामुख्याने तक्रार होती. यानंतर ट्रायने शुक्रवारी मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांना आदेश दिला.
मोबाईलवर करा आता इंटरनेट सुरू किंवा बंदही
मोबाईल फोन वापरणारे आता मोबाईल हँडसेटद्वारे त्यांची इंटरनेट सेवा सुरू (अॅक्टिव्हेट) करायची की खंडित (डिअॅक्टिव्हेट) करायची याचा
By admin | Published: August 7, 2015 09:59 PM2015-08-07T21:59:15+5:302015-08-07T21:59:15+5:30