Join us

टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटरच्या किमती कमी होणार; सणासुदीच्या काळात मिळणार गूड न्यूज?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 5:15 PM

जर एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी गूड न्यूज आहे.

जर तुम्ही टीव्ही, मोबाईल फोन किंवा कॉम्प्युटरसारखी एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी गूड न्यूज आहे. या सणासुदीच्या काळात त्यांची किंमत कमी होण्याची शक्यता आहे. उद्योग तज्ज्ञांच्या मते, कोरोनाच्या काळात दोन वर्षांत बहुतांश इलेक्ट्रॉनिक कम्पोनंट्स प्रकल्पात उत्पादनाच्या खर्चात झपाट्याने वाढ झाली होती. ती आता तुलनेनं कमी होत आहे. त्यामुळे या सणासुदीत इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.

टेलिव्हिजन, मोबाईल फोन, कॉम्प्युटरसारख्या बहुतांश इलेक्ट्रॉनिक कम्पोनंट्सच्या किमती आणि त्यांना प्रकल्पांमध्ये पाठवण्याचा मालवाहतूक खर्च गेल्या दोन वर्षांत विक्रमी उच्चांकीवर होता. परंतु आता तो कोविडपूर्व पातळीपर्यंत खाली आला आहे. दरम्यान, दिवाळीच्या सणासुदीच्या काळात किंमती कमी करून कंपन्या इनपुट कॉस्टमधील काही प्रमाणात मिळालेल्या दिलास्याचा फायदा ग्राहकांना देऊ शकतात. यामुळे गेल्या १२ महिन्यांतील मंदावलेल्या मागणीला चालना मिळू शकते. त्याच वेळी, कमी खर्चाच्या दबावामुळे ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांचं ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन देखील वाढण्याची अपेक्षा आहे.

किंमतीत मोठी घसरणकोविड दरम्यान, चीनमधून इलेक्ट्रॉनिक वस्तू्ंच्या प्रोडक्ट्सच्या कम्पोनंट्सच्या कंटेनरच्या मालवाहतुकीची किंमत ८००० डॉलर्सच्या सर्वोच्च पातळीवर होती, जी आता तुलनेनं घसरून ८५०-१००० डॉलर्सवर आली आहे. "सेमीकंडक्टर चिप्सच्या किमती आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर आल्या आहेत. तर इलेक्ट्रॉनिक कम्पोनंट्सच्या किमती ६० ते ८० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत," अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

काय म्हणतात तज्ज्ञ?सर्व इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि मालवाहतुकीच्या घटकांच्या किमती कोविडपूर्व पातळीपर्यंत घसरल्या आहेत. तर काही प्रकरणांमध्ये जागतिक मागणीत घट आणि काही देशांमध्ये मंदीमुळे किमती कमी झाल्या असल्याची प्रतिक्रिया सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर डिक्सन टेक्नॉलॉजीज इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अतुल लाल यांनी दिली.

टॅग्स :व्यवसायदिवाळी 2022