अविनाश कोळी ।
सांगली : एलईडी, एलसीडी टीव्हीच्या ओपन सेल पॅनेलला गेली वर्षभर माफ केलेले ५ टक्के आयात शुल्क १ आॅक्टोबरपासून लागू होत असून, पॅनेल उत्पादकांनीही किमती वाढविल्याने टीव्हीला दरवाढीचा शॉक बसणार आहे. शासनाकडून शुल्क सवलतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
केंद्र सरकारने १ आॅक्टोबर २०१९ रोजी वर्षाकरिता १५.६ आणि त्यापेक्षा अधिक इंचाच्या एलसीडी, एलईडी टीव्हीच्या ओपन सेल पॅनेलवर असलेले ५ टक्के आयात शुल्क माफ केले होते. ते आता १ आॅक्टोबरपासून पुन्हा लागू होणार आहे. त्यामुळे टीव्हीच्या किमती वाढणार आहेत. ओपन सेल पॅनेलचे उत्पादन केवळ चीन, दक्षिण कोरिया आणि तैवान या देशांमध्येच होते. टीव्ही पॅनेलमधील ७० ते ८० टक्के उलाढाल चायनीज कंपन्यांकडून होते. त्यामुळे पॅनेलबाबत जगातील उद्योजक चीनवर अवलंबून आहेत. भारतातील टीव्ही उद्योग अधिक सक्षम व्हावा, आत्मनिर्भर व्हावा म्हणून आयात शुल्क माफ केले होते; मात्र आता ते पुन्हा लागू झाले आहे. त्यामुळे दरवाढ होणार आहे. भारतीय टीव्ही उद्योजकांनी ही माफी कायम ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. शासनाकडून ही अपेक्षापूर्ती झाली नाही. कोरोनाकाळात या उद्योगासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत.टीव्ही उद्योगासमोर इतक्या अडचणी यापूर्वी कधी आल्या नाहीत. भारतीय टीव्ही उद्योजकांना पॅनेलसाठी अन्य देशांवर अवलंबून रहावे लागत आहे. दरवाढीमुळे ग्राहक घटण्याचीही भीती असते. त्यामुळे आयात शुल्कात सवलत द्यावी, अशी अपेक्षा आहे.- घन:श्याम आवटे, उद्योजकअन्य कारणांमुळेही होणार दरवाढच्कोरोनाकाळात देशांतर्गत वाहतूक खर्चात ५० ते ६०टक्के वाढ झाली आहे.जहाज वाहतुकीचा खर्च८ पटीने वाढला आहे.च्चीन, दक्षिण कोरिया व तैवानमधील ओपन सेलपॅनेल उत्पादक कंपन्यांनी कोरोनाकाळात २५ ते ३0टक्के दरवाढ केली आहे.केंद्र सरकारकडून आता५ टक्के आयात शुल्क पूर्ववत लागू झाले आहे.