करनीती भाग २00, सी. ए. उमेश शर्मा
अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा ?
कृष्ण : अर्जुना, आपल्या करनीती मालिकेला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. तरी त्यांनी सर्व कर कायद्याच्या तरतुदी समजून घेऊन व कर भरून, आर्थिक विकासात योगदान द्यावे. कर हा विषय नेहमीच अवघड वाटतो, त्यामुळे करदाते अतिशय त्रस्त होतात.त्यासाठी सहज आणि सोप्या भाषेतील ज्ञानार्जनाचा हा संवाद रूपी झरा चालूच राहील. आता नोटाबंदी, जीएसटी इत्यादी, यांच्यानंतर नागरिकांना त्रास होणार नाही, याची सरकारने काळजी घ्यावी. आशा करू या की, देशातील सर्व कर कायदे सोपे आणि सुरळीत होतील.
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, आज आपले करनीती मालिकेचे २०० भाग पूर्ण होत आहेत, तर त्याबद्दल कसे वाटत आहे?
कृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, आपण जून २०१३ मध्ये करनीतीचा प्रवास सुरू केला होता. आज करनीतीचे २०० भाग पूर्ण झाले. सामान्यांना करविषयक माहिती देण्यासाठी सुरू झालेली ही मालिका अतिशय यशस्वी ठरली. म्हणून आज खरच खूप आनंद झाला आहे.
अर्जुन : आपण या करनीतीच्या मालिकेला अनुसरून जीएसटीचे पुस्तक प्रकाशित करत आहोत, तर त्याची वैशिष्ट्ये कोणती?
कृष्ण : अर्जुना, जीएसटी नवीन कायदा असल्याने, तो समजावून घेणे थोडे कठीण होते, परंतु असे वाटले की, कायद्याच्या तरतुदी जर मातृभाषेत असल्या, तर त्या समजावून घेण्यात अडचण नाही. या संकल्पनेतूनच साकेत प्रकाशनाच्या सहयोगाने आपण ‘जीएसटी आपल्यासाठी’ हे पुस्तक निर्मित केले. यात आपल्याच संवादाच्या स्वरूपात कायद्याच्या तरतुदी समजावून सांगितलेल्या आहेत.
अर्जुन : कृष्णा, आपण या मालिकेवर आधारितच आयकराचेदेखील पुस्तक प्रकाशित करत आहोत. त्याची वैशिष्ट्ये काय?
कृष्ण : अर्जुना होय, आयकर हा प्रत्येक करदात्याच्या आणि सरकारच्या व्यवहारातील अतिशय महत्त्वाचा विषय आहे. प्रत्येक करदात्याला दरवर्षी त्याच्या उत्पन्नावर स्लॅब रेटनुसार कर भरावा लागतो. म्हणून त्याला आयकराच्या मूलभूत तरतुदी माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठीच सहज आणि सोप्या भाषेतील हे ‘इन्कम टॅक्स आपल्यासाठी’ हे पुस्तक आहे.
अर्जुन : कृष्णा, या पुस्तकांची काय गरज होती?
कृष्ण : करविषयक कायदे आणि त्यांची भाषा किचकट असते. सर्व सामान्य करदात्याला ते एखाद्या तज्ज्ञाने समजावून सांगेपर्यंत गूढच वाटतात, म्हणून तो हा विषयच सोडून देतो, परंतु या विषयाकडे आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही. कारण हा विषय दैनंदिन व्यवहाराशी निगडित आहे. त्याचबरोबर ‘भारत’ आता आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे त्यात सर्वांच्या योगदानाची आवश्यकता आहे, परंतु त्यासाठी सर्व करदात्यांना करकायद्याची मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे. म्हणून ही पुस्तके प्रदर्शित होत आहेत.
आज करनीतीचे द्विशतक ; याच मालिकेवर दोन पुस्तके
अर्जुना, आपल्या करनीती मालिकेला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. तरी त्यांनी सर्व कर कायद्याच्या तरतुदी समजून घेऊन व कर भरून, आर्थिक विकासात योगदान द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 02:38 AM2017-09-25T02:38:04+5:302017-09-25T02:38:08+5:30