Twitter Ads Revenue: इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरचे (Twitter) अधिग्रहन केल्यापासून यात अनेक बदल केले आहेत. अलीकडेच ट्विटरने आपला इनकम प्रोग्राम (Twitter Ads Revenue) सुरू केला आहे. याद्वारे युजर्सना पैसेही मिळत आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी ट्विटरकडून पैसे मिळत असल्याचा दावा केला आहे. तुम्ही देखील Twitter (X) वरुन पैसे कमवण्याचा विचार करत असाल, तर काही सोप्या पद्धती वापरुन मोठी कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला कंपनीच्या काही अटी आणि नियमांचे पालन करावे लागेल
Ye toh aapne apne saare followers ke blue tick ke paise wasool liye 😂
— Nitin Gupta (@asknitingupta) August 8, 2023
Mai toh itne mein hi khush hoon. pic.twitter.com/TWVKbyIfwv
Ads रेव्हेन्यू प्रोग्राम, कशी होते कमाई
एलोन मस्कच्या जाहिरातींच्या महसूल कार्यक्रमामध्ये, पात्र निर्मात्यांना प्लॅटफॉर्म जाहिरातींमधून जे कमावले जाते त्याचा वाटा मिळतो. तुम्हालाही या युजर्सप्रमाणे ट्विटर X मधून कमाई करायची असेल, तर त्यासाठी तुमचे ५०० पेक्षा जास्त फॉलोअर्स असणे आवश्यक आहे. याशिवाय, गेल्या 3 महिन्यांत तुमच्या खात्यावर 15 दशलक्ष ऑर्गेनिक ट्विट इंप्रेशन असावेत (खाते सत्यापित केले पाहिजे). तुम्ही या तीन अटी पूर्ण केल्यास तुम्ही एलोन मस्कच्या जाहिरातींच्या कमाई कार्यक्रमासाठी अर्ज करू शकता. म्हणजेच, या प्रोग्रामसाठी आपण आपल्या ट्विटर खात्यावर कमाई करणे आवश्यक आहे.
ट्विटरच्या Ads रेव्हेन्यू प्रोग्राममध्ये पात्र क्रिएटर्सना मिळालेल्या कमाईतील काही रक्कम दिली जाते. तुम्हालाही या युजर्सप्रमाणे कमाई करायची असेल, तर तुम्हाला 500 पेक्षा जास्त फॉलोअर्स गरजेचे आहेत. याशिवाय गेल्या 3 महिन्यांत तुमच्या (व्हेरिफाइड)अकाउंटवर 15 मिलियन ऑर्गेनिक ट्वीट इंप्रेशन असायला हवे. तुम्ही या अटींची पुर्तता केल्यास मस्क यांच्या ads रेव्हेन्यू प्रोग्रामसाठी अप्लाय करू शकता. म्हणजेच या प्रोग्रामसाठी तुमचे ट्विटर अकाउंट मोनेटाइज करावे लागेल.
This is what I am getting pic.twitter.com/uPkc3CJI8k
— karumugaa (@Karumugaa) August 8, 2023
900 रुपये भरुन लाखोंची कमाई
सोशल मीडियावर अनेक युजर्स आपल्या ट्विटर कमाईचे स्क्रीनशॉट्स शेअर करत आहेत. क्रिएटर्सना इस्टाग्राम आणि फेसबूकप्रमाणे ट्विटरवरुन पैसे मिळणे सुरू झाले आहे. भारतात ट्विटर सबस्क्रिप्शनसाठी वेब यूजर्सना 650 रुपये आणि मोबाईल यूजर्सना 900 रुपये द्यावे लागतील. याशिवाय 6,800 रुपयांचा वार्षीय प्लॅनदेखील उपलब्ध आहे.