Join us

Twitter Logo :ट्विटरवर‘ब्लू बर्ड’च्या जागी दिसू लागला ‘Doge’, तिकडे इलॉन मस्कचे बुडाले ७५ हजार कोटी रुपये, असा झाला गेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 12:46 IST

Twitter Logo : ट्विटर इलॉन मस्क यांच्या ताब्यात आल्यापासून ट्विटरमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

ट्विटर इलॉन मस्क यांच्या ताब्यात आल्यापासून ट्विटरमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. ब्लू टीक वापरणाऱ्यांसाठी पैसे द्यावे लागणार आहेत. तर दुकरीकडे आज ट्टिटर वापरकर्त्यांना मस्क यांनी धक्काच दिला. मस्क यांनी थेट ट्विटरचा लोगोच बदलला आहे, आज सकाळी इलॉन मस्क यांनी ट्विट करुन लोगो बदलल्याची माहिती दिली. आजपासून ट्विटरचा लोगो 'ब्लू बर्ड' नसून Doge असणार आहे. हा बदल आजपासून दिसत आहे. 

गेल्या काही दिवसापूर्वी इलॉन मस्क यांनी ट्विटरमधून अचानक कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा इलॉन मस्क यांना मोठा फटका बसला. मस्क यांची प्रमुख कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली, यामुळे मस्क यांना एका झटक्यात सुमारे ७५,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले. (Twitter Logo)

टेस्लाचे वार्षीक आकडे समोर आल्यानंतर ही घसरण झाली आहे. टेस्लाच्या शेअर्समध्ये सोमवारी मोठी घसरण झाली आहे. आकडेवारीनुसार, टेस्लाच्या शेअर्समध्ये यूएस स्टॉक मार्केटमध्ये ६.१२ टक्के म्हणजेच १२.६९ डॉलरची घसरण झाली आहे. त्यामुळे ट्विटरच्या शेअर्सची किंमत १९४.७७ डॉलर पर्यंत खाली आली. कंपनीचा स्टॉक १९९.९१ डॉलर वर उघडला आणि ट्रेडिंग दरम्यान कंपनीचा स्टॉक १९२.२० डॉलरवर पोहोचला. तसे, कंपनीच्या समभागांचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३८४.२९ डॉलरवर आला होता.

Twitter Logo : ट्विटरच्या इतिहासातील मोठा बदल, Elon Musk यांनी बदलला लोगो; ‘ब्लू बर्ड’च्या जागी दिसू लागला ‘Doge’

आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी इलॉन मस्क यांच्या नेट वर्थमध्ये ९ डॉलर बिलियन पेक्षा जास्त घसरण झाली, जर आपण भारतीय रुपयात बघितले तर ती ७५ हजार कोटींवर आहे. आकडेवारीनुसार, इलॉन मस्क यांच्याकडे सध्या १७८ डॉलर अब्ज शिल्लक आहेत. तसे, इलॉन मस्क सर्वाधिक संपत्ती कमावण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनी ही ४० डॉलर अब्ज निव्वळ संपत्ती निर्माण केली आहे. तसेच, ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत.

टॅग्स :एलन रीव्ह मस्कट्विटरशेअर बाजार